आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Complaints Against E commerce Increased 6 fold In Three Years, With Half Of Complaints Related To Online Purchases

दिव्‍य मराठी पडताळणी:ई-कॉमर्सविरोधातील तक्रारी तीन वर्षांत 6 पट वाढल्या,  निम्म्या तक्रारी ऑनलाइन खरेदीशी संबंधित

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात सर्वात जास्त ग्राहकांच्या तक्रारी अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या विरोधात झाल्या आहेत. यंदा ग्राहकांच्या निम्म्या तक्रारी आॅनलाइन शॉपिंगची सुविधा देणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात केल्या. विशेष म्हणजे, ई-कॉमर्स कंपन्यांच्या विरोधात तक्रारी दरवर्षी वाढत आहेत. या वर्षी जानेवारीपासून ते ऑगस्टदरम्यान राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (एनसीएच)च्या माध्यमातून जितक्या तक्रारी केल्या, त्यापैकी ४८% ई-कॉमर्स कंपन्यांच्या विरोधात होत्या. विशेष म्हणजे, कोरोनाच्या आधी म्हणजेच जानेवारी-ऑगस्ट २०१९ मध्ये ई-कॉमर्स कंपन्यांच्या विरोधात फक्त ८% तक्रारी करण्यात आल्या. तीन वर्षांत कंपन्यांविरोधातील तक्रारी सहापटीने वाढल्या. ग्राहक व्यवहार सचिव रोहितकुमार सिंग म्हणाले, “ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांना चांगली वागणूक देत नाहीत.’

रिफंडविषयी जास्त तक्रारी एनसीएचच्या आकड्यानुसार, ई-कॉमर्स क्षेत्राच्या विरोधात सर्वात जास्त तक्रारी रिफंडबाबत करण्यात आल्या. सर्वाधिक ग्राहकांनी सेवेत

उणिवांनंतर दाव्यावर पैसे परत न केल्याबद्दल तक्रारी दाखल केल्या. अशा तक्रारींपैकी सर्वाधिक तक्रारी उत्तर प्रदेशातील ग्राहकांनी केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या तर दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आता ६ लाख खटले प्रलंबित जिल्हा आयोग 4.5 लाख राज्य आयोग 1.4 लाख राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग 22 हजार

सर्वाधिक तक्रारी विम्यासंदर्भात वीमा 1.7 लाख बँकिंग 72 हजार हाऊसिंग 60 हजार (स्रोत: ग्राहक व्यवहार मंत्रालय) सरकार येत्या काही महिन्यांत लोकअदालती उभारणार सरकारनुसार, परिस्थितीनुसार देशातील विविध न्यायालयांमध्ये ग्राहकांशी संबंधित सुमारे ६ लाख खटले प्रलंबित आहेत. त्यावर उपाययोजना करण्यासाठी येत्या काही महिन्यांत लोकअदालती स्थापन करण्यात येणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...