आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात नियम-कायद्यांचे उल्लंघन आणि चुकीची माहिती देणाऱ्या जाहिरांतीविरोधात ग्राहक जागरूक होत आहेत. त्यामुळे अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काैन्सिल ऑफ इंडिया (एएससीआय) कडे तक्रारी वाढल्या आहेत. २०१९ नंतर गेल्या तीन वर्षांत पर्सनल केअर प्रॉडक्ट्सशी जोडलेल्या जाहिरातींविरोधातील तक्रारी तिपटीने वाढल्या आहेत.एएससीआयच्या आकड्यांच्या मते, २०१९-२० दरम्यान पर्सनल केअर प्रॉडक्ट्सच्या विरोधात २०० तक्रारी करण्यात आल्या. एप्रिल ते डिंसेबर २०२२ दरम्यान ज्यांची संख्या तीन पट वाढून ५९५ झाल्या. एएससीआयकडे सर्वात जास्त २६% तक्रारी शिक्षणासंबंधी जाहिरातींच्या विरोधात येतात. यात १५% हेल्थकेअर आणि १२% केअर प्रॉडक्ट्सचा वाटा आहे.
८४% दिशाभूल करणाऱ्या जाहिराती डायरेक्ट टू कन्झ्युमर ब्रँड्सविराेधात
एएससीआयच्या मते, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८४% दिशाभूल करणाऱ्या जाहिराती डी२सी म्हणजेच डायरेक्ट टु कन्झ्युमर ब्रँड्सच्या विरोधात आहेत. सोशल आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर या जास्त दिसून येतात. सर्वात जास्त ५५.३% दिशाभूल करणाऱ्या जाहिराती इन्स्टाग्रामवर आढळल्या. यानंतर यूट्यूब (२५.९%) आणि फेसबुक (११.३%)चा नंबर राहिला. म्हणजेच ९२.५% या तिन्ही प्लॅटफॉर्मवर फसव्या जाहिराती आढळल्या. वैयक्तिक काळजी श्रेणीतील ६८% दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सोशल मीडिया प्रभावक जबाबदार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.