आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन कार खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या:कारच्या कंपनीपासून ते मॉडेल आणि किंमतीपर्यंत या 5 गोष्टी लक्षात ठेवल्या तर पहिली कार निवडणे होईल सोपे

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा सविस्तर...

सेमीकंडक्टरमुळे कारच्या डिलिव्हरीला विलंब होत आहे. असे असूनदेखील सणासुदीच्या काळात त्यांची मागणी वाढली आहे. कोविड -19 साथीमुळे कुटुंबाच्या सुरक्षिततेमुळे, कार देखील लोकांची गरज बनली आहे. सुरक्षेच्या बाबतीत, जवळजवळ प्रत्येकाला त्यांच्या स्वतःच्या कारमध्ये प्रवास करायचा असतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्याबद्दल तुम्ही घाई करू नये.

कार खरेदी करण्यापूर्वी, त्याच्या किंमतीशी संबंधित काही प्रश्न तुमच्या मनात असायला हवेत. योग्य उत्तर मिळाल्यानंतरच आपली पावले उचला. येथे आम्ही अशा 5 गोष्टी सांगत आहोत, ज्या जाणून घेतल्यानंतर तुमच्यासाठी कार खरेदी करणे सोपे होईल.

जेव्हा आपण पहिली कार खरेदी करतो, तेव्हा कार कंपनीची निवड सर्वात महत्वाची असते, कारण कार खरेदी केल्यानंतर सामान्य माणूस ती सहज बदलू शकत नाही. अशा परिस्थितीत, कार कंपनीची निवड खूप महत्वाची बनते. भारतीय बाजारात मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा, महिंद्रा, फोर्ड, किया, फोक्सवॅगन, टोयोटा, होंडा, निसान, रेनॉल्टसह अनेक कार कंपन्या आहेत. त्यापैकी मारुती ही सर्वात मोठी कार विकणारी कंपनी आहे. त्याच वेळी, दुस-या क्रमांकावर ह्युंदाई आणि नंतर टाटाचे नावयेते.

खरं तर ज्या कंपन्या विक्रीच्या यादीत 5 व्या किंवा त्याखाली आहेत, त्यांच्या कारचा परफॉर्मन्स चांगला नाही, असे मुळीच नाही. ज्या कंपनीची कारविक्री अधिक असते, त्याकडे ग्राहकांचा ओढा अधिक असतो. त्यामुळे तुमच्या आवडीची कंपनी निवडा. तुमच्या आजूबाजूला जे लोक कार वापरतात त्यांचा सल्ला घ्या. तसेच, कारशी संबंधित अनुभव जाणून घ्या.

कार कंपनीच्या निवडीनंतर, दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कार खरेदी करण्याचा उद्देश काय आहे? म्हणजेच, तुम्ही एखाद्या विशिष्ट कामासाठी कार वापरणार आहात का? हे महत्वाचे आहे. कारण बाजारात हॅचबॅक, सेडान, एमपीव्ही, मिड एसयूव्ही आणि एसयूव्ही सेगमेंट कार आहेत. या सर्व कार वेगवेगळ्या उद्देशांसाठी बनवल्या आहेत.

जर तुमच्या कुटुंबात 5 लोक असतील तर हॅचबॅक तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. जर सदस्य 5 पेक्षा जास्त असतील तर तुम्हाला MPV किंवा 7 सीटर कारच्या दिशेने जावे लागेल. जर तुम्ही खराब रस्ते असलेल्या शहरात रहात असाल तर तुम्हाला एसयूव्ही सेगमेंटची निवड करावी लागले. जर तुम्ही जास्त सामानासह प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी सेडान योग्य पर्याय ठरु शकतो.

जेव्हा कार नेमक्या कोणत्या कारणासाठी खरेदी करायची हे ठरवले जाते, तेव्हा तिसरे काम असते ते म्हणजे कारचे मॉडेल आणि बजेट ठरवणे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला हॅचबॅक कार घ्यायची असेल, असेल तर तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागतील. समजा तुम्ही मारुतीची हॅचबॅक खरेदी केली तर तुम्हाला ऑल्टो, एस-प्रेसो, सेलेरियो, वॅगनआर, स्विफ्ट, इग्निस, बलेनो, एस-क्रॉस असे अनेक पर्याय मिळतील. सर्व कार 5 सीटर आहेत, पण किंमतीत खूप फरक आहे. जर तुमचे बजेट 5 लाखांच्या जवळपास असेल तर तुम्ही ऑल्टो, एस-प्रेसो आणि सेलेरियोची निवड करु शकता.

जर तुम्ही तुमच्या बजेटपेक्षा जास्त किंमतीची हॅचबॅक शोधत असाल तर तुम्ही कर्जाची रक्कम वाढवू शकता, पण त्यासाठी कर्जावरील व्याज दर, लोन प्रोसेसिंग फी, हिडन चार्जेस, लोन कोल्जिंग चार्जेस याची सविस्तर माहिती घ्या. तसेच, कर्जाची तुलना करा.

कार खरेदी करताना सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे त्याचे मायलेज. पेट्रोल कारपेक्षा डिझेल आणि सीएनजीचे मायलेज जास्त असते. मात्र, आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जवळपास सारख्याच झाल्या असल्याने डिझेल कार खरेदी करणे शहाणपणाचे मानले जात नाही. याचे कारण म्हणजे डिझेल कारची देखभाल किंमत पेट्रोलपेक्षा जास्त असते. त्याच वेळी, जर तुम्ही सीएनजी कारचा विचार केला तर त्याचे मायलेज चांगले असते, परंतु सीएनजी किटमुळे बूट स्पेस कमी होत असते.

कारचा वार्षिक मेंटेनन्स खर्चाबद्दल देखील माहिती असायला हवी. सध्याच्या काळात कारच्या देखभालीवर जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. त्याच वेळी, कंपन्या 5 ते 10 वर्षे कारच्या मेंटेनन्सच्या कॉस्टची यादी जारी करतात.

कार खरेदी करताना विमा सर्वात महत्वाचा आहे. जवळजवळ सर्व कंपन्या त्यांच्या डीलरकडून कार विमा देतात, म्हणून जर तुम्हाला बाहेरून कमी किंमतीत विमा मिळत असेल तर तुम्ही बाहेरून विमा घ्यावा. तसेच, इतर अ‍ॅक्सेसरीज आणि कारच्या भागांशी संबंधित गॅरंटी किंवा वॉरंटी पेपर्स घेण्याचे सुनिश्चित करा. उदाहरणार्थ, टायर, स्टीरिओ, बॅटरी इत्यादींवर वेगवेगळ्या वॉरंटी उपलब्ध आहेत.

बातम्या आणखी आहेत...