आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशांतर्गत शेअर बाजार मंगळवारी लागोपाठ पाचव्या दिवशी बढत घेऊन बंद झाले. जवळपास संपूर्ण दिवस किंचित घसरणीनंतर सेन्सेक्स २१ अंकांची बढत घेत ५८,१३६ वर बंद झाला. निफ्टीही ५.४० अंकांनी वाढून १७,३४५.४५ वर पोहोचला. विश्लेषकांच्या मते, सुरुवातीच्या घसरणीतून देशांतर्गत बाजारातील रिकव्हरी हे मजबुतीचे संकेत आहेत. कारण जगभरातील बहुतांश बाजारांमध्ये घसरण पाहायला मिळाली. वास्तविक आंतरराष्ट्रीय बाजाराचे गुंतवणूकदार दोन कारणांनी चिंतित आहेत.
एक म्हणजे सर्व मोठ्या देशांचे आर्थिक आकडे कमकुवत आले आहेत आणि दुसरे म्हणजे तैवानवरून अमेरिका व चीनमधील तणाव वाढला आहे. चीनने अमेरिकन सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पॅलोसी यांच्या तैवान दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे. कारण चीन तैवानला वेगळा देश नव्हे, तर आपलाच एक प्रांत मानतो. अशा स्थितीतही बीएसईवर एकूण ३,४९४ शेअर्सची ट्रेडिंग झाली. त्यापैकी १,८८४ वाढीवर बंद झाले. याच्या तुलनेत १,४८७ शेअर घसरणीवर बंद झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.