आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:आ‍पल्या ग्राहकांशी ‘लाइव्ह-वायर’प्रमाणे जोडलेले राहा

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील आठवड्यात एका पेट शॉपच्या मालकांचा मला मेसेज आला की, सर मागील दोन महिन्यांपासून तुम्ही आमच्या दुकानातून काहीही खरेदी केलेले नाही. आम्ही त्याच्या दुकानातून पाळीव प्राण्यांचे खाद्य खरेदी करतो. या मेसेजमुळे मी थोडा चकित झालाे. कारण त्यांच्या दुकानात नेहमी जातो. परंतु शक्यतो कोणत्याही प्रकारचे पेट फूड खरेदी करत नाही. कारण आमच्या घरातील पाळीव प्राणी शक्यतो ९० टक्के घरी बनवलेले पदार्थ खातात. त्याने ज्या ब्रँडचा उल्लेख केला तो शक्यतो भटक्या कुत्र्यांसाठी वापरला जातो. जे खाद्य आम्ही सकाळी फिरायला जाताना घेऊन जातो. परतु सध्या पावसाळ्याचे दिवस असून, आमच्या फिरायला जाण्याच्या वेळा बदलल्या आहेत आणि पावसामुळे भटकी कुत्रही आडोसा घेत लपलेली असतात. परंतु एखादा छोटा व्यापारी ही इतकी सखोल माहिती ठेवतो आणि जर कोणते उत्पादन विकले गेले नाही तर त्याचा खप वाढीसाठी मेसेज पाठवून प्रयत्नही करतो.

पण अगदी आमच्या घराच्या दाेन इमारती सोडून चिकटूनच असलेल्या एका आइस्क्रीम दुकानाच्या मालकाला हेदेखील माहीत नाही की, मी व्हॅनिला फ्लेवरव्यतिरिक्त दुसरे काहीही घेत नाही. बहुधा त्याचे कारण असे असावे की, कायम जेवणानंतर घरात आइस्क्रीम नसेल तर कोणत्याही फूड डिलिव्हरी अॅपचा वापर करून आइस्क्रीम मागवतो. पण माल कुठे चालला आहे, हे दुकानदाराला माहीत नसते. हे विचार माझ्या मनात घोळत असतानाच या रेस्टॉरंट्सनी त्यांच्या स्वत:च्या ग्राहकांबद्दलचे छोटेसे तपशीलही कसे गमावले आहेत आणि जे स्वतः फूड डिलिव्हरी व्यवसायात नाहीत अशा लोकांना फूड डिलिव्हरी करण्यास प्राधान्य देत आहेत हेही तेव्हाच माझ्या मनात येऊ लागले. गेल्या दोन वर्षांतील साथीच्या आजारामुळे, माझ्यासारखे तंत्रज्ञानाबद्दल अज्ञानी असलेले ग्राहकदेखील ऑनलाइन अन्न ऑर्डर करत आहेत. हा बदल पाहून, मोठ्या चेन रेस्टॉरंट्सनी आता त्यांच्या अॅप्सवर फूड डिलिव्हरीच्या तुलनेत १५-२०% अधिकची सवलत आणि प्रमोशनल ऑफर देऊ केल्या आहेत. हा प्रयत्न प्रचंड कमिशन आणि शोध ऑप्टिमायझेशन फीची भरपाई करण्याचा नाही. परंतु प्रामुख्याने या वितरण चॅनलवरील अवलंबित्व कमी करताना आपल्या नियमित ग्राहकांच्या संपर्कात राहण्याचा आहे. डोमिनोज पिझ्झा हे याचेच एक उदाहरण आहे, ज्यांनी देशभरात १६२५ आउटलेट्समध्ये मागील आठवड्यापासून आपल्या अॅपवर बुकिंगवर डिलिव्हरी, टेकअवे किंवा डाइन-इन वर ‘फ्री रिवॉर्ड ऑफर्स’ सुरू केल्या आहेत. केवळ मॅकडोनाल्ड, पिझ्झा हटसारख्या एमएनसी नाही तर देशी व्यवसाय करणाऱ्या म्हणजे रस्त्यांवर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांनी स्ट्रीट फूड्स ऑफ इंडिया किंवा पंजाब ग्रिल्स यांनीही आपल्या अॅपवरून भरगच्च सवलती देणे सुरू केले आहे, तेच छोटे हॉटेल व्यावसायिक आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी अजूनही या डिलिव्हरीवाल्यांंवर अवलंबून आहेत. त्यांचे सॉफ्टवेअर त्या फीचर्ससह तयार आहेत.

फंडा असा आहे की : आताच विक्री वाढवण्यासाठी ग्राहकांची माहिती आऊटसोर्स करू नका. जर तुमची ग्राहकांसोबतची प्रतिबद्धता चैतन्यपूर्ण आणि वैयक्तिक राहिली तर ते तुमचा व्यवसाय वाढवण्यात मदत करेल. कारण ते तुम्हाला त्यांची प्रत्येक खरेदीची माहिती मिळू शकेल. एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...