आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन:सुएझ कालव्यातील ट्रॅफिक जामचा परिणाम; पुरवठा साखळी विस्कळीत

लंडन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • युरोप आणि अमेरिकेच्या रिटेलर्सना पुरवठ्यातील अडचणींचा इशारा

इजिप्तच्या सुएझ कालव्यात गेल्या काही दिवसांत अडकलेले महाकाय जहाज बाहेर काढण्यात आले, मात्र त्याने गंभीर परिणाम मागे ठेवले आहेत. सुरुवातीच्या दिवसांत यामुळे जगभरातील पुरवठा साखळीचे संकट टळल्याचे वाटत होते. मात्र तसे ते नाही. जहाज काढण्याच्या एका आठवड्याहून जास्त अवधीनंतर जागतिक पुरवठा साखळीवर याचा दीर्घकाळ परिणाम राहू शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. एव्हर गिव्हन नावाचे महाकाय जहाज सुएझ कालव्यात अडकल्यानंतर शंभरपेक्षा जास्त मालवाहू जहाजे अडकली होती. याचा परिणाम आगामी दिवसांत दिसेल. सुएझ कालव्यात अडकल्यानंतर जहाजांना इच्छित स्थळी पोहोचण्यात अनेक दिवस जास्त लागू शकतात. हेलमेन वर्ल्डवाइड लॉजिस्टिक्सचे चीफ एक्झिक्युटिव्ह रिनर हेकेन यांच्या म्हणण्यानुसार, सुएझ कालव्याच्या ब्लॉकेजचा नकारात्मक परिणाम आगामी आठवड्यांत जागतिक पुरवठा साखळीवर दिसेल. कोविडच्या लॉकडाऊननंतर रिटेल सामग्रीची वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी जगभरातील कंटेनर शिपिंग कंपन्या माल भरत आहेत.

अशा घटनेसाठी तयार नव्हते जग, वेळ लागेल
अँटवर्प पोर्टच्या अधिकारी बार्बरा जॅनसीन म्हणाल्या, जागतिक पुरवठा साखळीवरील परिणाम अनेक महिन्यांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. सुएझ कालव्याच्या घटनेचा सामना करण्यासाठी जगभरातील कंटेनर शिपच्या ताफ्यात पुरेशी अतिरिक्त क्षमता नाही. लॉस एंजलिस बंदराचे संचालक युजिन सेरोका यांच्यानुसार, हा बॅकलॉग मे किंवा जूनपर्यंत चालू शकतो. जगातील ९० टक्के व्यापारी वाहतूक सागरी मार्गाने होते. आगामी दिवसांत जगातील बंदरांवर कंटेनर ट्रॅफिक सामान्य दिवसांच्या तुलनेत १०% वाढू शकते.

बातम्या आणखी आहेत...