आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Construction Sector Emerges From Carona Crisis, Demand For Ready to move Houses Increases During Ganeshotsav

बाजार अहवाल:काेरोना संकटातून बाहेर पडतेय बांधकाम क्षेत्र, गणेशोत्सवात रेडी टू मूव्ह घरांच्या मागणीत वाढ

भोपाळ/ अहमदाबाद/ औरंगाबाद/ जयपूर/ रायपूर/ रांचीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारी उपायांमुळे वेगाने पूर्ण होताहेत प्रकल्प, तयार मालमत्तेची मागणी वाढली
  • गृह कर्जाचा किमान दर, सरकारी सबसिडी, स्थिर किमतीने दिलासा

कोरोना संकटातून रिअल इस्टेट क्षेत्र बाहेर पडत आहे. सरकारी उपायांमुळे बिल्डर आपले प्रकल्प वेगात पूर्ण करत आहेत. यामुळे रेडी पझेशनच्या मालमत्तेची मागणी वाढली आहे. गणेशोत्सवानिमित्त अशा मालमत्तेची बुकिंग जास्त होत आहे. दिल्ली-एनसीआर, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि झारखंडसारख्या राज्यांत गेल्या वर्षीपेक्षा जास्त विक्री होण्याची आशा आहे. बहुतांश शहरांत गणेशोत्सवानिमित्त बुकिंगसाठी बिल्डरांकडे चौकशी होत आहे. पंजाबच्या ओमेक्स ग्रुपचे सीईओ मोहित गोयल म्हणाले, सरकारने उद्योग आणि पायाभूत क्षेत्राला बरीच मदत केली आहे. यासोबत लॉकडाऊनमध्ये अनेक लोक पंजाब व चंदीगडला परतले आहेत. यामुळे मागणी वाढली आहे. क्रेडाई दिल्ली एनसीआरचे सरचिटणीस गौरव गुप्ता म्हणाले, गणेश चतुर्थीनिमित्त घर आणि सदनिकांच्या बुकिंगमध्ये २० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश क्रेडाईचे मनोजसिंह मीक म्हणाले, मोठ्या शहरांतील लोक आता वर्क फ्रॉम होममुळे भोपाळला परतत आहेत. एनआरआयही भारतात मालमत्ता खरेदी करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे कोरोना संकटातही मागणी सुरू झाली आहे.

क्रेडाई औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष नरेंद्रसिंह जबिंदा म्हणाले, मुंबई आणि पुण्यात सेकंड होमची मागणी आहे. औरंगाबादसारख्या लहान शहरांत पहिल्या घराची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त १७५ ते २०० घरांची विक्री झाली. या वर्षी १०० घरांची विक्रीची शक्यता आहे.

> ऐतिहासिकदृष्ट्या गृहकर्ज सर्वात कमी दरावर उपलब्ध आहे.

> कोरोना काळात वर्क फ्रॉम होममुळे लोकांना आपले घर हवे आहे.

> परवडणाऱ्या घरासाठी सरकारी सबसिडी मिळत आहे.

छत्तीसगड : नवरात्र व दिवाळीसाठी आतापासूनच ऑफर लाँच

क्रेडाई छत्तीसगडचे अध्यक्ष रवी फतनानी यांच्यानुसार, येथे भूखंड, सदनिका आणि स्वतंत्र घराची मागणी चांगली आहे. गणेशोत्सवात कॅश डिस्काउंट, कम्युनिटी व क्लब मेंबरशिप शुल्कात सूट आणि पूर्ण फर्निश्ड घराची ऑफर दिली जाते.

गुजरात : ७० मजली इमारतींच्या मंजुरीने सकारात्मक वातावरण

अहमदाबादच्या तक्षशिला ग्रुपचे मालक कमलेश गोंडलिया म्हणाले, ४-५ महिन्यांत रिअल इस्टेट क्षेत्राला बूस्ट मिळाले. गुजरातमध्ये ७० मजली इमारत बांधकामास मंजुरी दिली आहे. यामुळेही बाजारात सकारात्मक वातावरण आहे.

राजस्थान : गेल्या वर्षापेक्षा ५०% जास्त बुकिंग होण्याचा अंदाज

या वेळी राज्यात सुमारे ५०० तसेच जयपूरमध्ये १५० सदनिका विकण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी जयपूरमध्ये गणेश चतुर्थीनिमित्त जवळपास १०० सदनिका विकल्या होत्या. गणेश चतुर्थीला बुकिंग करण्यासाठी लोकांनी चौकशी सुरू केली आहे.

गुंतवणुकीच्या अन्य पर्याय उदा. सोने-चांदी महाग झाली, मालमत्तेचे दर स्थिर आहेत. वर्क फ्रॉम होममुळे स्वत:चे घर खरेदी करण्याची लोकांची इच्छा वाढली आहे. कोरोना संकटातही गणेशोत्सवात चांगल्या बुकिंगची अपेक्षा आहे. सध्या मालमत्ता खरेदीचा सर्वात चांगला काळ आहे. - सतीश मगर, राष्ट्रीय अध्यक्ष, क्रेडाई

सरकारी मदतीने रिअल इस्टेट क्षेत्रात अनेक सुधारणा झाल्या आहेत. कर्ज स्वस्त आणि परवडणाऱ्या घराच्या किमतीही कमी आहेत. - वासिक हुसेन, अध्यक्ष, क्रेडाई मध्य प्रदेश

बातम्या आणखी आहेत...