आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीलसन आयक्यूचे सर्वेक्षण:दैनंदिन वापराच्या वस्तूंचा खप शहरांत वाढला, ग्रामीणमध्ये घटला

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (एफएमसीजी) म्हणजेच डबाबंद पदार्थ, पेये आणि साबण-तेल इत्यादी वस्तूंचा खप गेल्या जून तिमाहीत वेगाने वाढला आहे. जानेवारी-मार्च तिमाहीच्या ६ टक्के वाढीच्या तुलनेत एप्रिल-जून तिमाहीत देशाच्या एफएमसीजी मार्केटमध्ये १०.९ टक्के दराने वाढ नोंदवण्यात आली. तथापि, मागील तिमाहीत देशाच्या शहरी भागांत खप वाढला आहे, पण ग्रामीण भागात खप नकारात्मक राहिला.

बाजार सर्वेक्षण कंपनी नीलसन आयक्यूच्या ताज्या अहवालानुसार, जून तिमाहीत ७.८ टक्के दराने खप वाढला, तर मार्च तिमाहीत हा आकडा ५.५ टक्के होता. पारंपरिक किराणा दुकानांमध्येही या सामानांची विक्री वाढली आहे. ही विक्री मार्च तिमाहीच्या उणे ४.९ टक्क्यांवरून एप्रिल-जूनमध्ये उणे १.५ टक्क्यांवर आली. नीलसन आयक्यू सर्व्हेनुसार, दैनंदिन वापराच्या वस्तुंचे लहान पॅक मार्केटमध्ये आल्यामुळे आता ग्राहकांना अधिक संख्येने पॅक खरेदी करावे लागत आहेत. यामुळे जवळपास सर्व ब्रँडची विक्रीदेखील वाढली आहे. खाद्य आणि गैर-खाद्यपदार्थ दोन्हींत सरासरी पॅकचा आकार कमी झाला आहे. ग्राहक आता लहान पॅक खरेदी करणे पसंत करत आहेत. कंपन्या आणि ब्रँडही ग्राहकांच्या या खरेदीवर नजर ठेवून आहेत. त्यानुसारच ते पॅकिंग बाजारात आणत आहेत.

बातम्या आणखी आहेत...