आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानॅशनल पेन्शन सिस्टिम म्हणजेच एनपीएसचे सदस्य यूपीआयद्वारे देखील अंशदान करू शकतात. यूपीआयने पेमेंटची पद्धत सोपी आहे. अॅप स्टोर किंवा बँकेच्या संकेतस्थळावरून भीम, पेटीएम, गूगलसारखा एखादा अॅप डाउनलोड व अॅक्टिव्ह करावा लागेल. यूजरकडे यूपीआय अॅक्टिव्ह असेल तर एनपीएसचा हप्ता जमा करण्यासाठी एनपीएस ट्रस्टच्या वेबसाइटवर पेमेंट ऑप्शनच्या रुपात यूपीआयची निवड करावी लागेल. त्यानंतर व्हीपीए म्हणजे व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस नोंदवावा लागेल. त्यानंतर यूपीआय अॅप्लिकेशनवर पेमेंट नोटिफिकेशन मिळेल. यूजरला यूपीआय अॅप्लिकेशनवर लॉगइन करून दिलेल्या कालावधीत देवाण-घेवाणीची पुष्टी करावी लागेल. एनपीएस सदस्य यूपीआयने ट्रान्झेक्शनमध्ये करासह केवळ २ हजार रुपयांचे पेमेंट करू शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.