आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समन्वय सभा:मलकापूर येथील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी समन्वय सभा

मलकापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी येथील पंचायत समितीत आज मंगळवारी समन्वय सभा घेण्यात आली. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे तालुक्यात पाणीटंचाई सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यांची गंभीर दखल घेत त्वरीत सर्व योजना पुन्हा कार्यान्वित होण्यासाठी गटविकास अधिकारी उद्धवराव होळकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती मलकापूर येथे सर्व ग्रामपंचायत सरपंच, सचिव, पाणीपुरवठा विभाग नांदुरा यांचे संबंधित अधिकारी यांची समन्वय सभा घेऊन विद्युत जोडणी करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने दोन दिवसांत किमान वीस हजार रुपये प्रमाणे किंवा यापेक्षा जास्तीत जास्त रकमेचे धनादेश पाणी पुरवठा विभाग नांदुरा यांच्याकडे देण्याचे निर्देश दिले, सोबतच सरपंचांनी पाणी पुरवठा संदर्भात विविध अडचणी मांडल्या. यावरही समन्वय सभेत चर्चा केली. आजच्या सभेत विस्तार अधिकारी सपकाळ, शाखा अभियंता परळकर, विस्तार अधिकारी जाधव, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...