आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Corona And Economy | Sajjan Jindal Said The Business World Should Find New Ways Of Working, Only Then The Economy Will Return To Track, Housewives Get Opportunities From Work From Home

दिव्य मराठी विशेष:उद्याेग जगताने कामाच्या नव्या पद्धती शाेेधाव्या, तरच अर्थव्यवस्था होईल सुरळीत, वर्क फ्रॉम होममुळे गृहिणींनाही संधी : जिंदल

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व क्षेत्रांतील मॅन्युफॅक्चरिंग हब हटवले पाहिजेत, लहान उद्योगांना स्वस्तात कर्ज द्या : जिंदल

(धर्मेंद्रसिंह भदौरिया)

कोरोनामुळे देश ४२ दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये आहे. यामुळे लोकांच्या व्यावसायिक व खासगी आयुष्यात मोठे बदल झालेत. व्यवसायातही परिणाम दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर दैनिक भास्करने देशातील प्रमुख उद्योगपती आणि १४ अब्ज डॉलर्स म्हणजे १.६ लाख कोटी रुपयांची कंपनी जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदल यांच्याशी बातचीत केली. त्यांचे म्हणणे आहे की, लस येईपर्यंत आपण प्रतीक्षा करू शकत नाही. रोजीरोटीसाठी विषाणू धोका ठरू नये यासाठी ‘न्यू नॉर्मल’अंतर्गतच कामाच्या पद्धती शोधाव्या लागतील. त्यांच्यासोबतच्या बातचीतचा मुख्य अंश...

‘मी आणि कुटुंबाने स्क्रीन टाइम कमी केला’

व्यावसायिक पातळीवर मला ‘न्यू नॉर्मल’मध्ये काम करावे लागत आहे. सध्या मुले व नातवंडांसह कुटुंबासोबत मिळणाऱ्या वेळेचा आनंद घेत आहे. लॉकडाऊनने आम्हाला एकमेकांसोबत घालवण्यासाठी भरपूर वेळ दिला आहे. माझे कुटुंब आणि मी या वेळेला एका सूत्रात बांधले आहे- स्क्रीन टाइम (मोबाइल, टीव्ही, संगणक) नियंत्रित करत व्यायामाला प्राथमिकता दिली आहे. मी आमच्या ग्रुपमध्ये विविध टीमना जागतिक अपडेट राहणे, निरोगी दिनचर्या घालवणे व सकारात्मकता टिकवण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित केले आहे.

> कोरोनानंतर कार्यसंस्कृतीत कशा प्रकारच्या बदलांची अपेक्षा आहे?

- लॉकडाऊनने जगभरातील अनेक क्षेत्रांसाठी ‘वर्क फ्राॅम होम’ आवश्यक केले आहे. लांबून काम करण्यादरम्यान कुशलपणे काम करण्याची कर्मचाऱ्यांची क्षमता आपल्याला भविष्यात कामाच्या बाबतीत लवचिक धोरण स्वीकारण्यावर भर देण्यास भाग पाडेल. यामुळे असे वातावरण निर्माण होईल ज्यात येण्या-जाण्यात होणारा वेळेचा अपव्यय थांबेल आणि उत्पादकता वाढेल. उद्योग जगताला घरून काम करण्याच्या वातावरणाचे सकारात्मक प्रभाव दिसू लागल्यानंतर ‘होममेकर्स’ (गृहिणी) यांनाही नव्या संधी मिळतील.

> तुमच्या व्यवसायावर अल्पकालीन आणि दीर्घकालीन काय परिणाम होतील व तुमची काय योजना आहे?

-अल्पकाळाबद्दल बोलायचे तर आर्थिक हालचाली खूपच कमी झाल्या आहेत. मागणी कमी झाल्याने उपयुक्तता घटली आहे आणि मार्जिनदेखील. यामुळे नफा कमी झाला आहे. मग वापराच्या शैलीच्या स्तरावर ग्राहकांच्या वागणुकीतही मी बदल पाहतो. याचाही दूरपर्यंत परिणाम होईल. हे जे अनपेक्षित बदल होणार आहेत, त्यांच्यासाठी उद्योग जगतालाही कामकाजाचे अपारंपरिक मार्ग शोधावे लागतील. ज्याला सरकारच्या धोरणात्मक उपायांची गरज असेल, म्हणजे अर्थव्यवस्था सुरळीत करण्यात ‘व्ही’ आकाराच्या ग्राफची जलद गती देता येईल. दीर्घकालीन बदलांबद्दल बोलायचे तर सर्व व्यवसायांना या प्रकारचा काळ बरेच दिवस सहन करण्यासाठी रोख रकमेचा पुरेसा बफर तयार करण्याबरोबरच मजबूत ताळेबंद तयार करावा लागेल. आतापर्यंत तर उद्योग जगत या प्रकारच्या दीर्घकालीन उलथापालथीसाठी कंटिजेन्सी प्लॅन (आकस्मिक योजना) बनवत नव्हता. या दिशेने आता बदल होईल असे मला वाटते. जेएसडब्ल्यू ग्रुपमध्ये आम्हीदेखील नवे नियम, परंपरा स्वीकारत आहोत. आम्ही सुरुवातीपासून आमच्या खर्चाच्या आधाराची चौकशी करत आहोत आणि तंत्रज्ञान, डिजिटलायझेशन आणि इनोव्हेशनला नव्याने बघत आहोत. म्हणजे सर्व आव्हानांना तोंड देता येईल. मला वाटते की, आम्ही आधीपेक्षा जास्त मजबूत होऊन या संकटातून बाहेर येऊ.

> कोविड-19 मधून बाहेर पडण्यासाठी भारताला कोणत्या कृती आराखड्याची आवश्यकता आहे?

- भारत चर्माेद्योग, कृषी प्रक्रिया, वस्त्रोद्योग, औषधी, आयटी, धातू, खनिज विशेषत: पोलादासह सर्व क्षेत्रात जागतिक निर्मिती केंद्र बनले पाहिजेत. सरकारचे धाडसी धोरण आणि देशभरातील बिझनेस लीडर्सच्या सक्रिय सहभागातून म्हणजे स्वत:हून पुढाकार घेणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत मग कोणतेही क्षेत्र का असेना आणि उद्योग कितीही लहान-मोठा असेना, त्यांनी योगदान दिले पाहिजे.

> सरकारने कोरोनाशी लढण्यासाठी जी पावले उचलली, त्याकडे तुम्ही कसे पाहता?

- सरकारने संसर्गाचा वाढणारा आलेख खाली आणण्यासाठी जी पावले उचलली आहेत, ती कौतुकास्पद आहेत. पायाभूत क्षेत्रात सुरुवातीच्या स्तरावर सरकारी गुंतवणूक खूप आवश्यक आहे. उद्योग जगतास स्वस्त दराने कर्जाचा प्रवाह निश्चित व्हावा. बहुतांश विकसित देशांत कर्ज दर शून्याजवळ आहेत. भारतात सध्या हे जवळपास १०% आहेत. रिझर्व्ह बँकेने रोकडची पुरेशी उपलब्धता निश्चित केली आहे मात्र, बँका सध्या जोखिमेविरुद्ध आहे आणि उद्योग विशेषत: एमएसएमईला कर्ज देत नाहीत. दुर्दैवाने या कारणामुळे आर्थिक पुनरागमनाचा वेग मंद होईल. अर्थव्यवस्थेत वेगवान रोकड प्रवाह तत्काळ गरज आहे आणि या संदर्भात प्राधान्यासह पाऊल उचलले पाहिजे.

> तुमच्या कंपनीवर काय परिणाम झाला? आपल्या क्षेत्राकडे कसे पाहता ?

- आमच्या क्षेत्रासह व्यवसाय जगतावर परिणामचे दोन मुख्य बिंदू मला दिसतात. एक, खूप विश्वासार्ह पुरवठा साखळी अचानक उद्‌ध्वस्त झाली आणि दुसरे, विविध व्यावसायिक प्रक्रियेत अपेक्षित ऑटोमेशन आणि डिजिटलायजेशनची घट आहे. मला वाटते यानंतर क्षेत्र या दोन बाबी वेगात अंकारले. यामुळे ग्राहकांना गुणवत्तापूर्ण डिलिव्हरी देण्याच्या दिशेने पुरवठा साखळी सुरुळीत करणे, कार्यक्षमता सुधारणे, उत्पाकता वाढवणे आणि खर्च घटवण्यात मदत मिळेल. याचा अर्थ कामगारांना काढणे नाही. त्याऐवजी ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्याची पद्धती आहे.

> कोरोनाने २०२०-२१ चा बिझनेस प्लॅन कसा बदलला आहे?

-नव्या वित्त वर्षाची सुरुवात जागतिक स्तरावर उलथापालथीने झाली. मी २०२०-२१ बाबत आशावादी आहे. मला विश्वास आहे, दुसऱ्या सहामाहीनंतर अर्थव्यवस्था “व्ही’ आलेखाच्या शैलीत खूप बळकटीने पुनरागमन करेल. सरकारी धोरणे,वित्तीय पॅकेज पायाभूत गुंतवणूक उभारण्यासात अग्रणी भूमिका निभावेल.

> कोराेनाच्या परिणामापासून बाहेर पडण्यासाठी तुमच्या कंपनीत कोणती पावले उचलली जात आहेत?

- आम्ही आपल्या सर्व प्लँट लोकेशन्सवर जागतिक स्तरावर स्वीकार्ह विविध एसओपीला अंगीकारले आहे. या अंतर्गत फिजिकल डिस्टन्सिंग, व्यापक स्तरावर टेम्पेरेचर स्क्रीनिंग, कामाच्या ठिकाणी, टाऊनशिप व कामगार वसाहतील निर्जंतुकीकरणाचा यात समावेश आहे.