आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना महामारीमुळे बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. एप्रिल महिन्यात जवळपास 75 लाख लोक बेरोजगार झाले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक लोकांना आपल्या जॉबपासून मुकावे लागले आहे. यामुळे त्यांच्या चिंतेत भर पडली असून घरात अस्थिरतेचं वातावरण निर्माण झाला आहे. पण काळजी करुन नका तुमच्यात जर टॅलेन्ट असेल तर तुम्हीदेखील घरी बसल्या आपल्या कुटुंबासमवेत पैसे कमवू शकता. सोबतच आपल्या घरातील जे मुलं शिकत आहे किंवा दुसरे काम करत आहे अशा मुलं ही ऑनलाईन माध्यमातून आपल्या कमाईचे दार उघडू शकतात. त्यामुळे काळजी करु नका? चला तर मग पाहूया... की अशी कोणती कामे आहेत जी आपण घरी बसूनदेखील करु शकतो.
प्रथम सोप्या गोष्टी शोधा
सर्वात आधी कोणतेही काम करताना आपल्या क्षमता ओळखा आणि त्यानुसार कामाची निवड करा. त्यासाठी तुम्ही एक चांगली प्रोफाईल बनवून ती सोशल मीडियावर अपलोड करु शकता. त्यासोबतच सक्षम असल्यास 3-4 हजार रुपये खर्च करुन स्वत:चे संकेतस्थळ बनवता येईल. यामुळे तुम्हाला तुमच्या कामाची जाहिरातदेखील करता येऊ शकेल.
संबंधित वेबसाईटला भेट द्या
आपल्याला ज्या कामांमध्ये स्वारस्य आहे त्याला सर्वात आधी पसंती देत संबंधित संकेतस्थळांवर जाऊन पूर्ण माहिती भरा आणि रजिस्टर्ड करा. तुम्ही आर्थिक क्षेत्रांतदेखील तुमची क्षमता तपासून पाहू शकता याकरीता एखादा आर्थिक सल्लागार जर तुमच्या संपर्कात असेल तर त्याच्याकडून स्टॉक किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूकीची बारीक बारीक बाजू समजून घेऊ शकता. सध्या कोरोनामुळे बर्याच कंपन्या वर्क फ्रॉम होम देत आहे. त्यामुळे वाढत्या बेरोजगारीतदेखील खूप मोठी संधी आहे. फक्त त्या संधीचा फायदा घेता यायला हवा. त्यासाठी नवनवीन गोष्टी शिकण्यावर भर द्या.
फ्रीलांस वर्क
कोरोना काळात सर्वात जास्त काम जर कोणाला मिळाला असेल तर फ्रीलांस वर्क करणार्यांना... कारण देशातील अनेक कंपन्या या कामाला पसंती देत आहे. यामध्ये भाषांतर, कॉपी लेखन, व्हिडिओ संपादन, कॉपी डिझाईन, विपणन किंवा कोणतेही ऑनलाईन काम येते. जे आपण घरी बसून करु शकतो. यासोबतच इंग्रजीमधून प्रादेशिक भाषांमध्ये किंवा कोणत्याही भाषेमधून एखाद्या भाषेत अनुवादित करणे डिझाइन किंवा ग्राफिक यासारख्या कामांची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे.
कंपन्यांशी थेट संपर्क करा
जर तुम्हाला यामधील कोणतेही काम करता येत असेल तर तुम्ही थेटपणे कंपनीशी संपर्क करु शकता. याकरीता तुम्हाला कोणत्याच प्रकारच्या शिक्षणाच्या अट नाही. फक्त संबंधित संकेतस्थळांवर जाऊन पूर्णपणे माहिती भरून नोंदणी करण्याची गरज आहे. अशा कामांमध्ये आपल्याला तासांच्या आधारावर किंवा प्रोजेक्ट बेस पगार मिळू शकतो.
ऑनलाइन शिक्षण
कोरोना काळात शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, खाजगी क्लासेस बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यासोबतच देशात शिक्षण क्षेत्रात वेदांतू, टुटरमी किंवा बायजू यासारख्या ऑनलाइन शिकवणी साइट्स सुरु आहे. जेथे आपल्याला खूप मोठी संधी आहे. येथे नोंदणी केल्यानंतर मुलाखत होते. जर तुम्ही मुलाखतीत पास झाले तर तुम्ही घरी बसल्या मोठ्या प्रमाणावर पैसा कमवू शकता. याकरीता संबंधित कंपन्या दर तासाला किंवा मासिक आधारावर पैसे देतात.
ऑनलाइन सर्वे
कोरोना काळातील पैसे कमवण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता असेल तर ते आहे ऑनलाइन सर्वे. कारण यामध्ये कोणत्याच प्रकारच्या शिक्षणाची अट नसते. अशा कामांमध्ये ऑनलाइन सर्वे करायचा असतो ज्यामुळे आपल्याला पॉईंट मिळतो. त्या पॉईंटला नंतर आपण रोख रक्कमेतदेखील घेऊ शकतो. याबाबतीत सध्या बाजारात स्वॅगबक्स ही सर्वात प्रसिद्ध वेबसाइट असून त्यानंतर टॅली पल्स, कॅश क्रिएट, व्हॅल्यूड ओपिनियन्स इत्यादी समावेश होतो.
टी शर्ट डिझाइन
आजकाल अशा कलाकारांची मोठी मागणी आहे. कारण सध्या वाढदिवस, लग्न किंवा इतर कोणतेही प्रसंग असो लोक अशा डिझायनिंगच्या टीशर्ट आणि इतर सामानांची मागणी करताना आढळतात. अशावेळी आपल्याला फक्त अशा डिझाइनचे काम करावे लागते. सध्या बाजारात अशा कामांसाठी टी शॉपर, माय होम इत्यादी वेबसाइट्स हे काम उपलब्ध करुन देत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.