आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना इफेक्ट:महाराष्ट्रात 36% कंपन्यांना दुष्टचक्रात लागले टाळे, देशात तब्बल 7.55 लाख कंपन्या पडल्या बंद

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या संकटाचा उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. गेल्या वर्षभरात एकीकडे कंपन्या नोंदणीची संख्या घटत असतानाच आहे त्या कंपन्या बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरात देशात ३८ टक्के कंपन्या बंद पडल्या. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक ३६ टक्के कंपन्यांना टाळे लागले. यातून बेरोजगारीही वाढल्याचे चित्र आहे. कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे परिस्थिती सुधारण्याची चिन्हे नसल्याने सर्वच क्षेत्रातील कामगार गावी परतला. वाहतुकीवर निर्बंध असल्याने कच्चा माल आणि तयार मालाची वाहतूक खोळबंली. परदेशातून येणारा कच्चा माल पोहोचू न शकल्याने उत्पादन थांबवावे लागले. एकूणच कंपन्यांचे चक्र बिघडल्याने देशभरातील एकूण नोंदणीच्या ३८ टक्के म्हणजेच ७,५५,५१० कंपन्या बंद कराव्या लागल्या. यात महाराष्ट्रातील कंपन्यांची संख्या सर्वाधिक आहे.

महाराष्ट्राला मोठा फटका : एक मार्च २०२१ राेजी देशातील सर्वाधिक ४,१८७०७ नोंदणीकृत कंपन्या महाराष्ट्रात आहेत. यापैकी १,५१,७७२ (३६%) कंपन्या बंद आहेत. ३४३ कंपन्या निष्क्रिय, १९८० दिवाळखोरीत, ५५०२ दिवाळखोरीतून बाहेर निघण्याच्या प्रक्रियेत तर २५,९११० चालु स्थितीतील कंपन्या आहेत. यापाठोपाठ दिल्लीत नोंदणीकृत ३,६१,०७० पैकी २,१५,२६६ तर पश्चिम बंगालमध्ये २,१३,१०८ पैकी १,३१,४९२ कंपन्या अॅक्टिव्ह आहेत. एकट्या फेब्रुवारी २०२१ मध्ये राज्यात देशात सवार्धिक २६३५ कंपन्या नोंदवल्या गेल्या.

कोरोनात घटला, पुन्हा वाढल्या : जानेवारी २०२० पर्यंत दर महिन्याला सरासरी ९ ते १२ हजार नवीन कंपन्यांची नोंद होत होती. कोरोना येताच यात घसरण सुरू झाली. फेब्रुवारी २०२० मध्ये १०,४२९, मार्चमध्ये ५९०० तर एप्रिलमध्ये अवघ्या ३२०९ कंपन्यांची नोंद झाली. मेपासून यात वाढ होऊन जुलै ते ऑक्टोबरदरम्यान दरमहा १६ हजारांवर कंपन्या नोंदवल्या गेल्या. नंतर परत घसरण होत नोव्हेंबरमध्ये १३,८०० तर जानेवारी २०२१ मध्ये सुमारे ११,०१० कंपन्यांची नोंद झाली. फेब्रुवारी २०२१ वाढ हाेऊन १४,०९४ कंपन्यांची नोंदवल्या गेल्या.

देशात तब्बल 7.55 लाख कंपन्या पडल्या बंद
देशभरात एक मार्च राेजी २१,३३,८३५ कंपन्यांची नोंद आहे. यापैकी ७,५५,५१० कंपन्या (३५%) बंद आहेत. कंपनी कायद्याप्रमाणे २२५१ कंपन्या निष्क्रिय म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. ६८६९ कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत, तर ३९,४३४ कंपन्या दिवाळखोरीतून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेत आहेत. म्हणजेच देशातील एकूण नोंदणीकृत कंपन्यांपैकी फक्त १३,२९,७७१ म्हणजे ६२ % चालू आहेत. यातील ४२,१९८० कंपन्या आयटी, आर अँड डी, लॉ, ऑडिट, अकाउंटिंग आणि कन्सल्टन्सीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. २६,८०६९ कपंन्या उत्पादन, १७,०४०९ ट्रेडिंग, तर १०,८८३५ कंपन्या बांधकाम क्षेत्रातल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...