आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महारोगराई महागात पडली:60 लाख कोटी रुपयांत पडला कोरोना;आता 12 ते 14 टक्क्यांची वाढ आवश्यक

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कडक लॉकडाऊनदरम्यान हळूहळू अर्थव्यवस्था खुली झाली. जूनमध्ये निवडक क्षेत्र वगळता अर्थव्यवस्था अनलॉक झाली. अर्थतज्ज्ञांनुसार कोरोना आणि त्याच्याशी लढा देण्यासाठी लावलेल्या टाळेबंदीमुळे वित्त वर्ष २०२०-२१ देशाच्या अर्थव्यवस्थेला २०१९-२० च्या तुलनेत १६-१७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये असंघटित आणि अन्य क्षेत्र जोडून पाहिल्यास हे ६० लाख कोटीपर्यंतही जाऊ शकते.

कोरोनाची दुसरी लाट आली नाही तर २०२१-२२ मध्ये जीडीपी वृद्धी ११-१२ टक्के राहू शकते. जेएनयूचे निवृत्त प्रा. आणि अर्थतज्ज्ञ अरुणकुमार म्हणाले, सरकार २०२०-२१ साठी - ७.७ टक्के घसरणीबाबत बोलत आहे. सरकारचे ग्राह्य धरल्यास जीडीपीला १६ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. अरुणकुमार म्हणाले, सरकार असंघटित क्षेत्रातील आकडे नोंदवत नाही. माझ्या आकलनानुसार अर्थव्यवस्था ३० टक्के नकारात्मक झाली आहे. अशा स्थितीत ही ६० लाख कोटी रुपयांची घसरण आहे.

Q. अर्थव्यवस्था सुधारत आहे, मात्र आधीसारखा वेग कधी पकडेल?
या वर्षी डिसेंबरमध्ये पोहोचू डिसें. २०१९ च्या पातळीवर, तरीही ५ लाख कोटी अर्थव्यवस्था २०२७-२८ आधी शक्य नाही.

केंद्र सरकारचा थिंक टँक नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार म्हणाले, चालू वित्त वर्ष २०२०-२१ च्या तिसऱ्या तिमाहीतच सकारात्मक वृद्धी आली आहे. चौथ्या तिमाही तिसरीपेक्षा चांगली राहील. २०२१-२२ मध्ये रिअल टर्ममध्ये ११ टक्क्यांच्या आसपास वृद्धी होईल. पायाभूत सुविधा, निर्मिती, वाहन, सेवा क्षेत्रात चांगली वाढ पाहायला मिळू शकते. कृषी क्षेत्रात वाढ कायम राहील. जे लोक बाहेर पर्यटनाला जात होते ते आता देशातच पर्यटनाला जात आहेत. रेस्तराँ व्यवसाय आता टेक अवेमध्ये हिस्सेदारी वाढवत आहे.

५ लाख कोटींसाठी आता ६-७ वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल
११% वाढ असतानाही डिसेंबर २०२१ आपण डिसेंबर २०१९ च्या पातळीवर पोहोचू शकलो नाही. ५ लाख कोटी अर्थव्यवस्थेबाबत बोलायचे झाल्यास हा वेग २०२७-२८ पर्यंत प्राप्त होईल, असे वाटत नाही.

बातम्या आणखी आहेत...