आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Corona Has Made The Economy More Cashless Than Denomination, Lockdown Has Led To An Increase In Online Shopping; According To Experts, Black Money Is Growing Again In The Economy

अहवाल:नोटबंदीपेक्षाही कोरोनामुळे कॅशलेस झाली अर्थव्यवस्था, लॉकडाऊनमुळे ऑनलाइन खरेदीत झाली वाढ; तज्ज्ञांनुसार, अर्थव्यवस्थेमध्ये पुन्हा वाढतोय काळा पैसा

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये रोखीने व्यवहार करणाऱ्यांची संख्या निम्मी

देशाची अर्थव्यवस्था कॅशलेस होण्यासाठी करण्यात आलेल्या नाेटबंदीचा उद्देश त्या वेळी तितका फलद्रूप झाला नाही. मात्र आता काेेराेनाकाळाने चमत्कारच घडवला आहे. काेराेना कालावधीत डिजिटल व्यवहारांत विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे. लाेकल सर्कल्स या साेशल मीडिया प्लॅटफाॅर्मने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये राेख व्यवहारांचे प्रमाण कमी हाेऊन जवळपास निम्म्यावर आले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे काेराेनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लाॅकडाऊनमुळे लाेकांना घरातच बंदिस्त हाेऊन राहणे भाग पडले. भाेजन, आैषधे व कपड्यांसारख्या दैनंदिन वस्तूंसाठी ऑनलाइन स्टाेअरचा आधार घ्यावा लागला. या सर्वेक्षणात देशातील ३०० जिल्ह्यांतील १५ हजार लाेकांची मते घेण्यात आली.

लॉकडाऊनमुळे ऑनलाइन खरेदीत झाली वाढ

अहवालानुसार, बहुतांश राेखीने व्यवहार करणाऱ्यांचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटले आहे. २०१९ मध्ये २७% लाेक ५० ते १०० टक्के खरेदी काेणत्याही पावतीशिवाय राेेखीने करत हाेते. पण २०२० मध्ये हेच प्रमाण घसरून १४ टक्क्यांवर आले. केवळ डिजिटल व्यवहार वाढले नाहीत तर व्यवहाराचे प्रकारही वाढल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. सर्वेक्षणात सहभागी लाेकांनी सांगितले की, घरातील नाेकरांना वेतन वा बाहेर जेवण्यासाठीच राेख रकमेचा वापर केला. घरभाडे, मालमत्ता खरेदी किंवा घराच्या दुरुस्तीसाठी राेखीने व्यवहार केल्याचे ३ टक्के जणांनी सांगितले. चक्क ७% लोकांनी रोकडमध्ये लाच दिली.

काही वर्षांपासून भारतात डिजिटल पेमेंट वाढतेय

लाेकल सर्कल्सचे अध्यक्ष सचिन तापडिया म्हणाले की, ‘गेल्या काही वर्षांत देशात डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये डिजिटल पेमेंटमध्ये ३,४३४.५६ काेटींची भरभक्कम वाढ झाली.

तज्ज्ञांनुसार, अर्थव्यवस्थेमध्ये पुन्हा वाढतोय काळा पैसा

तज्ज्ञांनुसार, अर्थव्यवस्थेत काळा पैसा पुन्हा वाढतोय. नाेटबंदीमुळे केवळ काही वर्षांपर्यंत त्याचा पुरवठा ठप्प झाला होता. नाेटबंदीमुळे डिजिटल व्यवहार प्रचलित झाले असली तरी ८ महिन्यांनंतर लागू झालेल्या जीएसटीमुळे हे व्यवहार अधिक लाेकप्रिय आणि सक्षम झाले.

> 2019 या वर्षामध्ये 27% लोक आपली 50 ते 100% खरीदी पावती घेतल्याविना रोखीत करत होते. > 2020 या वर्षामध्ये त्यांचे प्रमाण 14% वर आले.

पाच वर्षांत डिजिटल पेमेंट व्यवहाराच्या प्रमाणात ५५.१% वाढ :

गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंट व्यवहाराच्या प्रमाणात ५५.१% आणि मूल्य स्वरूपात १५.२% वार्षिक वाढ झाली आहे. आॅक्टाेबरमध्ये यूपीआयआधारित पेमेंटमध्ये २०७ काेटी व्यवहार हाेऊन एक नवीन उंची गाठली.

बातम्या आणखी आहेत...