आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोन्याची किंमत बुधवारी सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. कोरोना रुग्ण वाढणे, सुरक्षित गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सकारात्मक कलामुळे गुंतवणूकदार सतत सोन्यात गुंतवणूक करत आहेत. बुधवारी प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४८,८२५ रुपयांवर पोहोचली आहे. एमसीएक्सवर सोने ऑगस्ट वायदा भाव ४८,९८२ रु. प्रति १० ग्रॅमच्या नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. चांदीचा भावही सप्टेंबर वायदा ५०६ रुपये किंवा १ टक्के वाढून ५०,८९१ प्रतिकिलोवर पोहोचला आहे. सोन्याची किंमत १६ मार्च २०२० चा नीचांकी स्तर ३८,४०० प्रति १० ग्रॅमवरून २७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. वार्षिक आधारावर सोन्याची किंमत २५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
न्यूयॉर्कच्या कमोडिटी एक्स्चेंजमध्ये ऑगस्ट डिलिव्हरीचे सोने मंगळवारी १.३% उसळून, १,८०४ डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचले होते. हा नोव्हेंबर २०११ नंतरचा उंच स्तर आहे. ८ वर्षांपासून जास्त काळात सोने प्रथमच १,८०० डॉलर प्रति औंस पार झाले. हे १,८००.५० डॉलर प्रति औंसवर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सप्टें.२०११ मध्ये विक्रमी स्तर प्राप्त केला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.