आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Corona Infection Caused People To Book Taxis Instead Of Air rail; Bookings Tripled

दिव्य मराठी विशेष:कोरोना संसर्गामुळे विमान-रेल्वेऐवजी टॅक्सी बुक करून लोक फिरू लागले; बुकिंगमध्ये तिपटीने झाली वाढ

शरद पांडेय | नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेकमाय ट्रिप, गोआयबीबो आणि यात्रा डॉट कॉमच्या आकडेवारीतून खुलासा

कोरोनामुळे लोक विमान आणि रेल्वेऐवजी खासगी टॅक्सी बुक करून फिरायला पसंती देत आहेत. लोकांना टॅक्सी जास्त सुरक्षित वाटत आहे. एवढेच नव्हे तर आता लोक दीर्घ सुटीचे नियोजन करण्याऐवजी तीन ते चार दिवसांचे नियोजन करत आहेत. वाहतूक ऑपरेटर्स, मेकमाय ट्रिप, गोआयबीबोच्या आकडेवारीनुसर, सामान्य दिवसांच्या तुलनेत सध्या टॅक्सीची बुकिंग जवळपास तिप्पट वाढली आहे. देशात जवळपास ४० लाख टॅक्सी आहेत. यापैकी ११ लाखांच्या जवळपास पर्यटन उद्योगाशी थेट जोडले आहेत. म्हणजे हॉटेलद्वारे आणि ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या प्रवासी संस्थांशी जोडले आहेत. दुसरीकडे, सुमारे २९ लाख लोकांकडे वैयक्तिक टॅक्सी आहेत, ज्या अॅपच्या माध्यमातून बुकिंग किंवा ट्रॅव्हल एजन्सीशी जोडल्या आहेत. बस ऑपरेटर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडियाचे चेअरमन प्रसन्ना पटवर्धन म्हणाले, लोक फिरण्यासाठी सामान्य दिवसांच्या तुलनेत सध्या खासगी टॅक्सींचा वापर जास्त करत आहेत. यामुळे टॅक्सी ऑपरेटर्सला थोडा दिलासा मिळाला आहे. टूर अँड ट्रॅव्हल संस्थांनुसार, जून आणि जुलैमध्ये लोक केवळ आवश्यक कामांसाठी प्रवास करत होते. कारण, असा प्रवास करणाऱ्यांची बुकिंग एका बाजूची असायची. यामध्ये बहुतांश बुकिंग ट्रेन किंवा िवमानाची होत होती. मात्र, ऑगस्टमध्ये हा कल बदलला आहे. लोक कुटुंबासोबत फिरायला बाहेर पडत आहेत. याशिवाय लोक रेल्वे किंवा विमानाऐवजी टॅक्सीने जाण्यासाठी आणि येण्यासाठी बुक होत आहेत. यात्रा डॉट कॉमच्या सहसंस्थापक सबिना चाेप्रा म्हणाल्या, सध्या टॅक्सी आणि कार बुकिंगच्या कलात वाढ झाली आहे. त्यांनी सांगितले की, कमी अंतराच्या टॅक्सीची मागणी वाढत आहे. द फेडरेशन ऑफ असोसिएशन इन इंडिया टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी(फेथ)चे सरचिटणीस सुभाष गोयल म्हणाले, जवळपास फिरण्यासाठी टॅक्सीची बुकिंग वाढली आहे. त्यामुळे ट्रॅव्हल ऑपरेटर्सही कास्ट टू कॉस्टमध्ये टॅक्सी बुकिंग करत आहेत. त्यांनी सांगितले की, सध्या ग्रुप बुकिंग खूप कमी झाली आहे, बहुतांश बुकिंग विभक्त कुटुंबातून होत आहे. याशिवाय लोक दीर्घ सुटीचे नियोजन करण्याऐवजी कमी दिवसांची(३ ते ४ दिवस) बुकिंग करत आहेत.

बुकिंगआधी स्वच्छतेवर चौकशी

मेकमाय ट्रिपचे ग्राउंड ट्रान्सपोर्टचे सीईओ परीक्षित चौधरी म्हणाले, त्यांच्या पोर्टलवरून होत असलेल्या बुकिंगमध्ये टॅक्सच्या मागणीत सामान्य दिवसांच्या तुलनेत तिप्पट वाढ झाली आहे. मात्र, लोक बुकिंग करताना स्वच्छतेवर जास्त लक्ष देत आहेत. स्वच्छतेबाबत अॅप बनवले आहे. त्यात प्रवास सुरू करण्याआधी चालकाला मास्कसह छायाचित्र अपलोड करावे लागते. सॅनिटायझरसोबत सेल्फीही घ्यावी लागते.

बातम्या आणखी आहेत...