आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना इफेक्ट:​​​​​​​रिअॅल्टीत तेजी, जगात निवासी मालमत्तांच्या किमतीत वाढ, महारोगराईदरम्यान अमेरिका, ब्रिटनसह 25 देशांत उपनगरीय भागाला नागरिकांची पसंती

लंडन7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतातही सूट कपात करताहेत विकासक, किंमत वाढवण्याची तयारी

कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर जगभरातील घरांच्या किमतीत तेजी दिसत आहे. अमेरिकेत जानेवारीपासून आतापर्यंत घरांच्या किमती ११ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. ही गेल्या १५ वर्षांत सर्वात जास्त तेजी आहे. इंग्लंडमध्ये वर्षभरात घरांच्या किमतीत ८ टक्क्यांची वाढ नोंदली आहे. जगातील २५ देशांमध्ये घरांच्या किमती वार्षिक आधारावर सरासरी ५ टक्के वाढल्या आहेत.

भारताचा विचार केल्यास २०२० ची अखेरची तिमाही आणि २०२१ च्या पहिल्या तिमाहीत हाउसिंग श्रेणीत चौकशी बरीच वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून घर खरेदीचा ट्रेंडही बदलला आहे. लोक मोठ्या शहरांतील गर्दीपासून दूर १००-१५० किमी क्षेत्रात कमी लोकसंख्येच्या मात्र, सहज पोहोचू शकणाऱ्या भागात घर खरेदी करणे पसंत करत आहेत. कोविड-१९ नंतर हा ट्रेंड आणखी वाढला आहे. कोविड-१९ मुळे लावलेल्या टाळेबंदीमुळे लोकांना घरच त्यांचे कार्यालय, मुलांची शाळा, जिममध्ये रूपांतरित केले आहे. लोक आपला बहुतांश वेळ घरात घालवत आहेत. त्यामुळे आपले घर असणे, मोठे घर असणे, दाट लोकसंख्येपासून दूर असणे लोकांची पहिली पसंत झाली आहे. भारतात आता लोक मोठ्या शहरांपासून दूर उपनगरीय भागांत मालमत्तेची विचारपूस करत आहेत. क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष जक्षय शहा म्हणाले, कोविड-१९ नंतर लोकांना स्वत:च्या घराचे महत्त्व समजले आहे आणि रेसिडेन्शियल हाउसिंगची मागणी वाढत आहे. वर्क फ्रॉम होममुळे जिथे काम आणि अभ्यासासाठी स्वतंत्र जागा असावी असे मोठे घर खरेदी करण्यात लोक रस दाखवत आहेत. यासाठी लोक शहरांपासून ५०-६० किमी दूर उपनगरीय भागांत घर खरेदी करणे पसंत करत आहेत. विशेषत: जिथे वाहतूक सुविधा आहे किंवा ज्यांच्याकडे स्वत:चे साधन आहे असे लोक विकासकांकडे अशा घरांची मागणी करत आहेत.

भारतातही सूट कपात करताहेत विकासक, किंमत वाढवण्याची तयारी

मालमत्ता कन्सल्टंट फर्म नाइट फ्रँक इंडियाच्या मुख्य अर्थतज्ज्ञ व राष्ट्रीय संचालक रजनी सिन्हा म्हणाल्या, कोविड-१९ नंतर भारतात आणखी मोठ्या घराची मागणी वाढली आहे. देशाच्या ८ मोठ्या शहरांचा विचार केल्यास शहरे आणि उपनगरीय भाग दोन्हीतही घरांची मागणी वाढत आहे. सप्टेंबर-डिसेंबरपासून मागणीतील वाढ आता वेग पकडत आहे. आता स्थिती अशी की, विकासक आधी सूट देत होते, आता सूट कमी होत आहे आणि मालमत्तेचा किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...