आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाशी युद्ध : देशाकडे धान्याचा पुरेसा साठा; सध्याच्या साठ्यातून गरजूंंना 18 महिन्यांपर्यंत करता येईल पुरवठा

Aurangabad6 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • निरनिराळ्या याेजनांतर्गत सध्या धान्याचा वार्षिक खप आहे 5 ते 6 टन

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या महामारीचा जगातील प्रत्येक देश सामना करत आहे. भारतातही कोरोनापासून निपटण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. देशव्यापी लॉकडाऊनही याचाच भाग आहे. अशा कठीण काळात खाद्यपदार्थांशी संबंधित एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. देशात अन्नाची कमतरता नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाचे (एफसीआय) अध्यक्ष डी. व्ही. प्रसाद यांनी सांगितले.

एप्रिलच्या शेवटपर्यंत देशभरातील गोदामांमध्ये १० कोटी धान्याचा साठा हाेणार आहे. तर, देशाला ५ ते ६ टन कोटी धान्याची वार्षिक गरज असते, असेही प्रसाद यांनी साांगितल. ते पुढे म्हणाले की भारत २०१९-२० मध्ये २९.२ कोटी टन धान्याचे उत्पादन घेणार आहे. गहू आणि तांदळाबाबत देशाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. देशातील प्रत्येक भागात पुरवठा केला जाईल. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्य घेणारे लोक तातडीने सहा महिने पुरेल ‌‌एवढे धान्य खरेदी करू शकतात, असे अन्न व पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी नुकतेच सांगितले आहे. यासाठी राज्यांना आपली साठवणूक क्षमता वाढवावी लागणार आहे.

राज्ये ३ कोटी गहू-तांदळाची खरेदी करू शकतात, तीन महिन्यांचा साठा उधार मिळेल
प्रसाद यांनी सांगितले की, सद्य:स्थितीत राज्यांना ३ कोटी गहू आणि तांदळाची खरेदी केंद्र सरकारकडून करावी लागू शकते. यामु‌ळे ते पुुढील महिन्याची गरज भागवू शकतात. यासाठी पुरेसा साठा आहे. केंद्राकडे असलेल्या साठ्यात एप्रिलपर्यंत ६.४ कोटी टन वाढ होऊ शकते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी सांगितले होते की, राज्ये तीन महिन्यांचा कोटा एफसीआयकडून उधारीने घेऊ शकतात. या साठ्याच्या माध्यमातून नागरिक पुढील सहा महिन्यांची गरज भागवू शकतात.

एफसीआय प्रमुख म्हणाले, लॉकडाऊन लांबले तरी घाबरण्याची गरज नाही

घाबरून खरेदी करण्याची गरज नाही
सध्या जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची स्थिती आहे. अनेक विकसित देशांमध्ये नागरिकांनी भीतीमुळे खरेदी सुरू केली आहे. ते खाद्यपदार्थांचा साठा करत आहेत. अमेररिका, रशिया, ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. मात्र, भारतातील नागरिकांनी घाबरून खरेदी करण्याची गरज नाही, असे आवाहन प्रसाद यांनी केले. देशात पुरेशा प्रमाणात अन्नधान्याचा साठा आहे त्यातून सगळ्यांची गरज भागेल.

0