• Home
  • Business
  • Corona Virus Impact: In the last one month, the world's top 5 billionaires have suffered more losses

कोरोना व्हायरस इम्पॅक्ट : गेल्या एका महिन्यात जगातील अव्वल २० अब्जाधीशांची संपत्ती २२ लाख कोटी रु. घटली, देशात सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींचे जास्त नुकसान

  • सोमवारच्या घसरणीनंतर सेन्सेक्स फेब्रुवारीच्या मध्यात आपल्या उच्च स्तरावरून सुमारे ३५ टक्के कोसळला 
  • वर्षाच्या सुरुवातीस ५,८६० कोटी डॉलर नेटवर्थ, आता ३,३४० कोटी डॉलर

दिव्य मराठी नेटवर्क

Mar 24,2020 11:01:04 AM IST

नवी दिल्ली - कोरोना विषाणूने जागतिक अर्थव्यवस्थेसोबत जगातील अव्वल अब्जाधीशांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या एक महिन्यात जगातील टॉप-२० अब्जाधीशांची संपत्ती २२ लाख कोटी रुपये(२९,३०० कोटी डॉलर) कमी झाली आहे. फेब्रुवारी मध्यात अमेरिकी शेअर बाजार डाऊ जाेन्स आपल्या उच्च पातळीवर होता, तेव्हा अव्वल २० श्रीमंतांची एकूण संपत्ती १०७ लाख कोटी रुपये(१.४ लाख कोटी डॉलर) होती. बाजार पडल्यानंतर ही जवळपास ३०० अब्ज डॉलर घटून १.१ लाख कोटी डॉलर राहिली. या दरम्यान भारतीय बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सोमवारी घसरणीनंतर मोठी घसरण पाहायला मिळाली. सोमवारी घसरणीनंतर सेन्सेक्सही फेब्रुवारी मध्यातील आपल्या उच्च पातळीपासून जवळपास ३५ टक्के कोसळला आहे. या दरम्यान डॉलरच्या तुलनेत सर्वात जास्त नुकसान लक्झरी फॅशन अब्जाधीश एलव्हीएमचचे सीईओ बर्नाड अर्नाल्ट यांचे झाले. रविवारी अर्नाल्टनी आपल्या परफ्यूम बनवणाऱ्या कंपनीत हँड सॅनिटायझर निर्मितीची सुरुवात केली आहे. एलव्हीएमएचचा समभाग एक महिन्यात जवळपास ३०% कोसळला. १३ फेब्रुवारीला त्यांची संपत्ती ७०९० कोटी डॉलर होती, जी सोमवारपर्यंत २९६० कोटी डॉलर घटली आहे.

सोमवारी सर्वाधिक नुकसान फेसबुकच्या झुकेरबर्ग यांचे

सोमवारी जगभरातील शेअर बाजारांत मोठी घसरण झाली. या घसरणीत सर्वात जास्त नुकसान फेसबुकचे झुकेरबर्ग यांचे झाले. सोमवारी फेसबुकचे समभाग १४ टक्के कोसळले. त्यामुळे कंपनीचे बाजार भांडवल ८८० कोटी डॉलर घटले. सीईओचा बाजारावर परिणाम सुरू झाल्यानंतर फेसबुकचे समभाग ३१ टक्के कोसळले आहेत. परिणामी कंपनीची संपत्ती ५४३० हजार कोटी डॉलर राहिली.

रिलायन्सच्या समभागांत सलग घसरण

गेल्या एका महिन्यात संपूर्ण जगात टक्क्यांच्या हिशेबाने रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांची संपत्ती सर्वात जास्त घटली आहे. सोमवारी भारतीय शेअर बाजारात इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण नोंदली आहे. या घसरणीनंतर २०२० मध्ये मुकेश अंबानी यांची संपत्ती जवळपास ४१ टक्के घटली आहे. ब्लूमबर्गनुसार, वर्षाच्या सुरुवातीस अंबानींची संपत्ती ५८६० कोटी डॉलर होती, जी सोमवारी ३३४० कोटी डॉलर राहिली.

X