आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आऊटसोर्सिंग:कोरोना लाटेत वॉल स्ट्रीटच्या दिग्गजांना फटका, भारतात बॅक ऑफिसचे काम ठप्प

सरिता राय| बंगळुरूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 14 लाख कोटींवर आऊटसोर्सिंग , 50 लाख रोजगारावर परिणाम

अमेरिकेतील वॉल स्ट्रीटच्या अनेक दिग्गज कंपन्यांचे बॅक ऑफिस भारतात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बंगळुरू, मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरांतील कामावर परिणाम झाला आहे आणि वॉल स्ट्रीटचे दिग्गजही यापासून दूर राहिले नाहीत. वॉल स्ट्रीटपासून जवळपास १३,३५७ किमी दूर बंगळुरूच्या बाह्य रिंग रोडच्या टॉवरमधील गोल्डमन सॅक्स आणि यूएसबी ग्रुपसारख्या दिग्गज कंपन्यांत हजारो कर्मचारी काम करतात. या कंपन्या वॉल स्ट्रीटमध्ये जोखीम व्यवस्थापनापासून ग्राहक सेवा आणि अनुपालन यासारखी अनेक महत्त्वाची कामे करतात. सध्या या इमारतीतील बहुतांश कार्यालये रिकामे दिसत आहेत. स्टँडर्ड चार्टर्डनुसार, त्यांचे भारतात २०,००० कर्मचाऱ्यांपैकी ८०० हून जास्तीना संसर्ग झाला आहे. यूएसी टीमचे २५ टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी कामावर येत नाहीत. वेल्स फार्गो अँड कंपनीच्या बंगळुरू आणि हैदराबादेतील कार्यालयांत को-ब्रँडेड कार्ड, बॅलेन्स ट्रान्सफर आणि रिवार्ड प्रोग्रामचे काम ठरलेल्या वेळेपेक्षा मागे सुरू आहे. त्यांचे भारतात ३५,००० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. हे कार, होम लोन आणि बँकिंगच्या अनेक कामांशी संलग्न आहेत.

भारताचा आऊटसोर्सिंग उद्योग सुमारे १९४ अब्ज डॉलर(१४.२ लाख कोटी रु.) मूल्याचा आहे आणि यामध्ये ५० लाखांपेक्षा जास्त लोक काम करतात. गार्टनर इंकचे वरिष्ठ संचालक डी.डी.मिश्रा यांनी सांगितले कमी,ही कोणतीही स्थानिक समस्या नाही, केवळ भारताची समस्या नाही. हे जागतिक संकट आहे.

भारताच्या आऊटसोर्सिंग उद्योगासाठी मोठा धोका

भारतात स्वस्तात इंग्रजी जाणणारे कर्मचारी मिळणे सोपे आहे. या कारणामुळे जगभरातील बहुतांश मोठ्या कंपन्या आपले काम येथे आऊटसोर्स करतात आणि अनेकांनी भारतातील दिल्ली, मुंबई, बंगळुरूसारख्या शहरांत आपले बॅक ऑफिसेस स्थापन केली आहेत. सध्याच्या संकटाला तोंड देण्यासाठी बॅक ऑफिस युनिट पार्ट टाइम कर्मचाऱ्यास नियुक्त करत आहेत. काही काम फिलिपाइन्ससारख्या देशात ट्रान्सफर केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...