आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • COVID Proof Jobs: Workers In These Sectors Likely To Get Salary Hikes Even As Layoffs Rise In Others

घोर निराशा:या वर्षी सुद्धा पगारवाढ नाहीच: फक्त आयटी आणि ई-कॉमर्स अशा मोजक्याच कर्मचाऱ्यांना मिळणार इंक्रिमेंट; या सेक्टर्समध्ये कॉस्ट कटिंगची तयारी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केवळ या सेक्टरच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ, या क्षेत्रातील लोकांना फटका

देश विदेशातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोना आणि लॉकडाउनच्या संकटामुळे इंक्रीमेंट दिला नाही. यावर्षी तरी पगारवाढ मिळेल अशी भोळी अपेक्षा नोकरी करणाऱ्यांना असताना एक निराशाजनक रिपोर्ट समोर आला आहे. त्यानुसार, या वर्षी बहुतांश कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवणारच नाहीत. टीमलीजने नोकरी आणि वेतनावर प्रायमर रिपोर्ट-2020 जारी केला आहे. त्यानुसार, मोजक्याच कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना यावर्षीचा इंक्रीमेंट देणार आहेत. त्यातही हा इंक्रिमेंट अत्यल्प स्वरुपाचा राहील.

केवळ या सेक्टरच्या कर्मचाऱ्यांना मिळू शकते पगारवाढ

रिपोर्टनुसार काही कंपन्या स्पेशल स्किल्स असलेल्या कर्मचाऱ्यांना 15 टक्के पगारवाढ देऊ शकतात. अशा कर्मचाऱ्यांना सोडून जाऊ नये असे कंपन्यांना वाटते. परंतु, बहुतांश कर्मचाऱ्यांना यावर्षी वेतनवाढ दिली जाणार नाही. तरीही ई-कॉमर्स, स्टार्टअप सेक्टर, एफएमसीजी, बीपीओ, आयटी आणि आरोग्य सेवा अशा सेक्टर्समध्ये पगारवाढ दिली जाऊ शकते.

या सेक्टर्समध्ये कपातीची तयारी

टीमलीजच्या प्रायमर रिपोर्टनुसार, यावर्षी केवळ ई-कॉमर्स, एफएमसीजी, बीपीओ आणि आयटी सेक्टरमध्ये इंक्रिमेंट होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, एअरलाइन इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी आणि खर्च कपात होण्याची भीती आहे. ऑटोमोबाइल उद्योगात सुद्धा गेल्या वर्षभरापासून मंदी आहे. नुकसान होत असल्याने या सेक्टरमध्ये सुद्धा कर्मचारी कमी केले जाऊ शकतात. पर्यटन आणि हॉटेल, रेस्तरॉ व्यवसाय सुद्धा ठप्प आहे. अशात या सेक्टरमध्ये पगारकपात केली जाऊ शकते.

पगार वाढीस कंपन्यांचा संकोच

टीमलीज सर्व्हिसेजच्या कार्यकारी उपाध्यक्ष ऋतुपर्णा चक्रवर्ती यांनी सांगितल्याप्रमाणे, एकीकडे अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्यास संकोच करत आहेत. तर दुसरीकडे, स्पेशल स्किल्स असलेल्यांना यात फायदा सुद्धा होत आहे. कोरोना महामारीमुळे काही क्षेत्रांमध्ये कर्मचाऱ्यांची मागणी वाढल्याचे देखील दिसून आले आहे.

बातम्या आणखी आहेत...