आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउच्च व्याजदराच्या बाबतीत या वर्षापासून दिलासा मिळू शकतो. देशातील आणि जगातील बँकिंग तज्ज्ञ आणि वित्तीय संस्थांच्या अंदाजानुसार, भारतातील किरकोळ महागाई दर ६% च्या खाली येऊ शकताे. दुसरीकडे, आर्थिक विकास दर मंदावण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक रेपो दरात कपात करण्यास सुरुवात करू शकते. त्यामुळे कर्ज स्वस्त मिळू लागेल. रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात धोरणात्मक दर वाढवले नाहीत. पण रेपो दर अजूनही ६.५०% वर आहे, जो सात वर्षातील सर्वोच्च पातळी आहे. एसबीआयचे गट मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष म्हणाले, “आरबीआयच्या ताज्या निर्णयापूर्वी, उच्च व्याजदर दीर्घकाळ चालू राहतील, अशी भीती होती. मात्र आता काही महिन्यांत व्याजदर कमी होण्यास सुरुवात होईल आणि कपातीची प्रक्रिया दीर्घकाळ सुरू राहील, अशी अपेक्षा आहे.
ऑक्टोबरनंतर दर ०.७५% कमी होऊ शकतो दर आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ६.५% आर्थिक विकास दराचा अंदाज बरोबर असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी, रिझर्व्ह बँक ऑक्टोबर २०२३ नंतर रेपो दरात ०.७५% कपात करू शकते. -नोमुरा, जपानची आर्थिक कंपनी
२०२४ च्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत रेपो दरात ०.२५-०.२५% ने कपात केली जाऊ शकते. किरकोळ चलनवाढ ६% च्या खाली राहील, जी रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्याची वरची मर्यादा आहे. -गोल्डमन सॅक्स, अमेरिकन गुंतवणूक बँकिंग कंपनी
जर भारतातील महागाई अपेक्षेपेक्षा जास्त असेल तर पॉलिसी रेटदेखील वाढवता येतील. पण आर्थिक वाढ मंदावल्यास दरांमध्ये तीव्र कपातीचा पर्यायही स्वीकारला जाऊ शकतो. -सिटी, अमेरिकन बँकिंग कंपनी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.