आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरकारी तेल कंपन्यांनी चालवलेली नफेखोरी पुन्हा एकदा सामान्यांच्या खिशाला जड झाली आहे. डिसेंबरमध्ये कच्चे तेल (क्रूड) उतरले. त्याच हिशेबाने कंपन्यांनी दर कमी केले असते तर पेट्रोल ८ रुपये आणि डिझेल ७ रुपये स्वस्त झाले असते. दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोलवर एक्साइज ड्यूटी प्रति लिटर ५ रुपये, डिझेलवर १० रुपये कमी केली. बहुतांश राज्यांनीही व्हॅट कमी केला. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर काहीसे कमी झाले. यानंतर आंतरराष्ट्रीय घटनाक्रमांमुळे कच्च्या तेलाचे दर कमी होणे सुरू झाले. क्रूड नोव्हेंबरच्या ८०.६४ डॉलरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये ७३.३० डॉलर/ प्रति बॅरल झाले. देशात पेट्रोल-डिझेलचे दर रोज निश्चित होतात. मात्र, दर कमी करण्याची वेळ आली तेव्हा सरकारी कंपन्यांनी नफा कमावला.
रेटिंग एजन्सी इक्राचे उपाध्यक्ष व पेट्रोलियमविषयक तज्ज्ञ प्रशांत वशिष्ठ म्हणतात, दराचा आढावा घेण्याचा उद्देश क्रूड वाढले तर दर वाढावेत आणि कमी झाले तर कमी व्हावेत हा होता. अनेकदा राजकीय निर्णयापोटी दर कमी केले जातात. त्याची भरपाई कंपन्या नंतर करतात.
खेळ कंपन्यांचा... क्रूड ३.७ डॉलर घसरले तेव्हा पेट्रोल फक्त ६५ पैसे स्वस्त केले, क्रूड ३.७ डॉलर वाढले तर पेट्रोल ३.८५रु. महाग
ऑगस्टमध्ये क्रूड ३.७४ डॉलर/बॅरल स्वस्त झाले तेव्हा कंपन्यांनी पेट्रोल फक्त ६५ पैसे स्वस्त केले. तर, सप्टेंबरमध्ये क्रूड जेव्हा ३.३३ डॉलरने वाढले तेव्हा पेट्रोल ३.८५ रुपये/ लिटर वाढवण्यात आले. नोव्हेंबरमध्ये क्रूडचे दर कमी झाले, मात्र पेट्रोलचे दर वाढतच गेले. पेट्रोलच्या दरांत शेवटची कपात ५ सप्टेंबर रोजी झाली, तीही फक्त १५ पैसेच.
कंपन्यांचा नफा २० पटीपर्यंत वाढला
तेल कंपन्या आयओसीएल, बीपीसीएल आणि एचपीसीएलचे सप्टेंबरचे आकडे पाहिले तर या कंपन्यांचा नफा कोविडपूर्वीच्या काळापेक्षा २० पट वाढला आहे. आयओसीएलचा नफा सप्टेंबर-२०१९ मध्ये ३९५ कोटी होता, सप्टेंबर २०२१ मध्ये ८३७० कोटी रुपये झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.