आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कच्च्या तेलांच्या किमतीत घट:मागणी घटल्याने कच्च्या तेलात घट, ब्रेंट प्रति बॅरल 87 डॉलरवर कायम

न्यूयॉर्क10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमध्ये कोरोनाचे निर्बंध पुन्हा कडक झाल्याने कच्च्या तेलाची मागणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच कच्च्या तेलांच्या किमतीत ऑगस्टपासून आतापर्यंत सर्वात मोठी साप्ताहिक घट दिसून आली. गेल्या आठवड्यात १०.२% घसरल्यानंतर सोमवारी ब्रेंट क्रूड ८७.०९ प्रति बॅरलवर स्थिरावले. तो गेल्या सोमवारी ९६.९५ डॉलर प्रति बॅरल होते. चीनमध्ये तब्बल सहा महिन्यांनंतर शनिवारी कोविड संसर्गामुळे पहिला मृत्यू झाला. यानंतर रविवारी असे आणखी दोन मृत्यू झाले. त्यामुळे सर्वात मोठा तेल आयातदार चीनवर पुन्हा एकदा नव्याने निर्बंध लादण्याची भीती निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...