आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंधन दरवाढ:कच्चे तेल 66% स्वस्त, तरी सरकारने कर 16 रुपये वाढवून जनतेला लाभ देणे टाळले

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सहा दिवसांत पेट्राेल 3.31 आणि डिझेल 3.42 रुपयांनी महागले

देशात शुक्रवारी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल लिटरमागे ५७ पैसे, तर डिझेल ५९ पैसे महागले. ६ दिवसांत पेट्रोल ३.३१, तर डिझेल ३.४२ रुपयांनी महागले. दिल्लीत पेट्रोल ७४.५७, डिझेल ७२.८१ रुपये झाले. कोरोना महामारीदरम्यान जगभरात कच्चे तेल ६६% स्वस्त झाले. मात्र, सरकारने याचा लाभ जनतेला होऊ दिला नाही. सरकारची तिजोरी भरण्यासाठी मार्च ते जूनदरम्यान दोन वेळा पेट्रोलवर १३ रुपये आणि डिझेलवर १६ रुपये कर वाढवला. सोबत राज्यांनीही व्हॅट वाढवला आहे. तज्ज्ञांनुसार, सरकारने हा कर वाढवला नसता तर पेट्रोल-डिझेल आतापेक्षा १५ ते २० रुपयांनी स्वस्त झाले असते.

जानेवारीत कच्चेे तेल ७० डॉलर प्रतिपिंप होते. २० जानेवारीला ते ५८ डॉलरवर आले. २१ एप्रिलनंतर किमती वाढू लागल्या होत्या. सध्या हा दर ३८ डॉलरवर आहे. सीए कीर्ती जोशीनुसार, डिझेल ही देशात एकमेव अशी वस्तू आहे,ज्यावर ३००% हून जास्त कर आहे.

पेट्रोल-डिझेलची मूळ किंमत २० रुपये, आपण देतोय ७० रुपयांहून अधिक पैसे

सध्या ज्या इंधनासाठी लोक ७० रुपयांहून अधिक पैसे मोजत आहेत त्याची मूळ किंमत २० रुपयांहून कमी आहे. उर्वरित रक्कम कराच्या रूपात जाते.

बातम्या आणखी आहेत...