आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Crypto Business Halved After 30% Tax, WazirX Volume Down 65% Between April And May, Coin DCX Down 64%

30% करानंतर क्रिप्टो व्यवसाय निम्म्यावर:एप्रिल ते मेदरम्यान वझीरएक्सचे व्हॉल्यूम 65%, कॉइन डीसीएक्समध्ये 64% घट

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिप्टो मालमत्तेवर कर लागू झाल्यापासून देशातील क्रिप्टो व्यवसायाची चमक कमी होऊ लागली आहे. १ एप्रिलपासून क्रिप्टो मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर ३०% कर लागू झाल्यापासून, क्रिप्टो बाजारात परिमाणस्वरूप (व्हाॅल्यूम) आत्तापर्यंत ४०-५०% घसरण झाली आहे. याशिवाय, १ जुलैपासून आकारल्या जाणाऱ्या १% टीडीएसबाबत स्पष्टता नसल्यामुळे देशात अशा मालमत्तेबाबत उदासीनता वाढली आहे.

क्रिप्टो एक्स्चेंज वझीर एक्सचे उपाध्यक्ष राजगाेपाल मेनन म्हणाले, नियमांच्या अभावामुळे भारतीय क्रिप्टो एक्स्चेंजचा व्हाॅल्यूम ३०-४० टक्क्यांनी कमी झाला आहे. ३०% कर लागू झाल्यानंतर देशातील क्रिप्टो बाजार थोड्या काळासाठी सावरला, परंतु बँकिंग क्षेत्राने हात मागे खेचल्यानंतर व्हाॅल्यूम पुन्हा कमी होऊ लागला. कॉइन मार्केट कॅप आणि कॉइन गेको, वझीरएक्स, कॉइन डीसीएक्स आणि इतर क्रिप्टो एक्स्चेंजेसच्या डेटानुसार कर लागू झाल्यानंतर व्हॉल्यूम आणि किंमत दोन्हीमध्ये लक्षणीय घट झाली. वझीरएक्सच्या व्हॉल्यूममध्ये ६५% घट झाली तर काॅइन डीसीएक्सच्या व्हाॅल्यूममध्ये ६४ टक्के घट झाली. तथापि, या महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात क्रिप्टो चलनाचे प्रमाण ६४% ने वाढले आहे.एप्रिल-मे दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात क्रिप्टोचे प्रमाणही कमी झाले आहे, परंतु ते भारताच्या तुलनेत कमी आहे. राजगोपाल मेनन म्हणाले, रशिया-युक्रेन युद्ध हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मूल्य घसरण्याचे एक प्रमुख कारण आहे.

व्यवहारात गुंतवणूक कमी होईल
झेबपेचे सीईओ अविनाश शेखर म्हणाले, १ जुलैपासून प्रत्येक क्रिप्टो विक्री किंवा हस्तांतरणावर १% टीडीएस लागू होईल. जर क्रिप्टो-फिएट व्यवहारांबद्दल बोलायचे तर खरेदीदाराला विक्रेत्याच्या वतीने हा टीडीएस कापून भरावा लागेल. क्रिप्टो-क्रिप्टो स्वॅपमध्ये खरेदीदार आणि विक्रेते दोघांवर टीडीएस लागू होईल.

मूर्ख सिद्धांतावर आधारित क्रिप्टो प्रकल्प : बिल गेट्स
ब्लूमबर्ग | मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी पुन्हा एकदा क्रिप्टोकरन्सीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी नॉन फंगीबल टोकन (NFT) सारख्या क्रिप्टो प्रकल्पांना बनावट म्हटले, ते मूर्ख सिद्धांतावर आधारित असल्याचे सांगितले. टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीवर त्यांनी अनेकदा टीका केली आहे. गेल्या वर्षी, टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांच्याशीही त्यांचा या मुद्द्यावर वाद झाला होता.

क्रिप्टो ट्रेडिंग कमी होण्याची तीन मुख्य कारणे
1. क्रिप्टोच्या उत्पन्नावर ३० टक्के कराची घोषणा.
2. बँकांद्वारे क्रिप्टो मालमत्ता व्यवहार टाळणे.
3. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रिप्टो किमतीत घट.

बातम्या आणखी आहेत...