आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Crypto Currency | Marathi News | Crypto Advertising Has A Lot Of Risks, Sinking Doesn't Help

पुढाकार:क्रिप्टो जाहिरातीत खूप जोखीम असल्याचे सांगावे लागेल, बुडाल्यास मदत नाही

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आभासी डिजिटल मालमत्तांशी संबंधित जाहिरातींसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
  • १ एप्रिलपासून अंमलबजावणी, १५ एप्रिलपूर्वीच्या जाहिरातींना लागू

“चलन’ सारखे शब्द क्रिप्टोशी संबंधित जाहिराती आणि प्रचार साहित्यात वापरले जाणार नाहीत. अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड‌्स कौन्सिल ऑफ इंडियाने (एएससीआय) बुधवारी आभासी डिजिटल मालमत्तांसाठी(व्हीडीए) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. अशा जाहिरातींमध्ये या खूप जोखमीच्या मालमत्ता आहेत, असा डिस्क्लेमरही देणे आवश्यक असेल. त्याचप्रमाणे अशा व्यवहारांमुळे उद्भवलेल्या कोणत्याही नुकसानासाठी कोणतीही नियामक मदत मिळणार नाही, असेही यात म्हटले आहे. वास्तविक देशात मान्यता नसतानाही क्रिप्टो मालमत्तेची (बिटकॉइनसारखे आभासी चलन आणि एनएफटी ) लोकप्रियता व विस्तार वाढतच आहे. त्यांच्याशी संबंधित प्लॅटफॉर्मच्या जाहिरातीही येऊ लागल्या आहेत. एसएससी मार्गदर्शक तत्त्वांचे ठळक मुद्दे

1. क्रिप्टो उत्पादने आणि एनएफटीचे नियमन केले जात नाही आणि त्या खूप धोकादायक मालमत्ता असू शकतात. अशा व्यवहारांमुळे होणाऱ्या कोणत्याही तोट्यासाठी कोणतेही नियामक समर्थन असणार नाही असे जाहिरातीत स्पष्ट करावे लागेल 2 करन्सी, सिक्युरिटीज, कस्टाेडियन , डिपाॅझिटरी शब्द वापरता येणार नाहीत. 3. १२ महिन्यांपेक्षा कमी कालावधीचे रिटर्न जाहिरातींमध्ये नमूद केले जाणार नाहीत. 4. जाहिरातींमध्ये जाहिरातदाराचे नाव, फोन नंबर किंवा ई-मेल आयडी स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. 5. व्हीडीए उत्पादने किंवा व्हीडीए ट्रेडिंग हे पैसे आणि व्यक्तिमत्त्वाशी संबंधित समस्यांवर उपाय असू शकतात, असे दाखवता येणार नाही. 6. जाहिरातीमध्ये हमी किंवा भविष्यात नफा वाढवण्याचे आश्वासन विधाने नसावीत. व्हीए उत्पादने समजण्यास सोपी आहेत आणि त्यामध्ये गुंतवणूक करण्याबद्दल जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही, असेही सांगता येणार नाही. 7. व्हीडीए उत्पादनांची तुलना नियमन केलेल्या कोणत्याही मालमत्तेशी करू नये.

भास्करने उचलला हाेता जाेखमीचा मुद्दा : दैनिक भास्करने २४ जानेवारीच्या अंकात क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणे खूप धोकादायक आहे आणि जर गुंतवणूकदारांचे पैसे त्यात बुडाले तर त्यांना पोलिस किंवा कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही, असे सांगितले हाेते.

यामुळे मार्गदर्शक तत्त्वांची गरज
देशात १० कोटींपेक्षा जास्त क्रिप्टो गुंतवणूकदार आहेत. त्यानुसार, क्रिप्टो व्यापाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत भारत संपूर्ण जगात पहिल्या क्रमांकावर आहे. गुंतवणूकदारांची संख्या वाढवण्यासाठी, क्रिप्टो एक्स्चेंजेसने आक्रमक जाहिराती देण्यास सुरुवात केली आहे. बॉलीवूडचे तारेही या कामात गुंतले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांची फसवणूक होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...