आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Crypto Currency | Marathi News | Cyber Criminals Have Laundered Rs 2.5 Lakh Crore Through Crypto In 4 Years

चिंताजनक:सायबर गुन्हेगारांनी 4 वर्षात क्रिप्टोद्वारे केले अडीच लाख कोटींचे मनी लाँड्रिंग

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पॉन्झी योजनांसारखी फसवणूक, हॅकिंगचे पैसे क्रिप्टो वॉलेटमध्ये ठेवतात
  • ​​​​​​​क्रिप्टो चलनाची अवैध धारणा 79% नी वाढली ​​​​​​​

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएम) प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि प्रसिद्ध गुंतवणूकदार चार्ली मॅनेजर यांसारख्या मोठ्या व्यक्ती केवळ क्रिप्टोकरन्सीच्या विरोधात नाहीत. यामागे ठोस कारण आहे. गेल्या वर्षभरात क्रिप्टो करन्सीमधील व्यवहार जवळपास सहापटीने वाढले आहेत. यासोबतच त्यात पैसे टाकणाऱ्या गुंतवणूकदारांचे केवळ मोठे नुकसानच झाले नाही तर गुन्हेगारी कारवायांमध्येही क्रिप्टो करन्सीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.

ब्लाॅकचेन विश्लेषक कंपनी चेनालिसिसच्या एका अहवालानुसार गेल्या वर्षात बेकायदेशीर पत्ते असलेल्या वाॅलेटमध्ये पडून असलेल्या क्रिप्टाे चलनाचे मूल्य ७९ टक्क्यांनी वाढून १४ अब्ज डाॅलरच्या (१ लाख काेटींपेक्षा जास्त) वर गेले आहे. इतकेच नाही तर या काळात गुंतवणुकदारांनाही जवळपास ५५ काेटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. बेकायदेशीर पत्ते असलेल्या वाॅलेटमध्ये घाेटाळ्याचे पैसे असतात.हे गुन्हेगार विविध पॉन्झी योजना आणि विकेंद्रित वित्त (डिफाय) हॅक करून पैसे गोळा करतात. काॅइनडेएक्स सारख्या कंपन्यांचे प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या लोकांची संख्या एक काेटीच्या वर जाण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी काॅइनडेक्सने जोखीम-निरीक्षण कंपनी सॉलिड्स लॅबसोबत भागीदारी केली आहे.

क्रिप्टोकरन्सी चोरीत ५१६ टक्क्यांनी वाढ
गेल्या वर्षी क्रिप्टोच्या वाढत्या व्यवहारासोबतच त्याची चोरी देखील २०२० च्या तुलनेत ५१६% वाढली आहे. २४ हजार कोटी रुपयांची क्रिप्टोकरन्सी चोरीला गेली असल्याचे आकडेवारी सांगते.
२.५ लाख कोटींचेे मनी लाँड्रिंग

सायबर गुन्हेगारांनी २०१७ पासून आतापर्यंत ३३ अब्ज डाॅलर(रु. २.४६ लाख कोटी) किमतीच्या क्रिप्टो चलनात मनी लाँड्रिंग केले आहे. पैसे काढण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.

एकूण व्यवहारात ५६७ टक्के वाढ

चेनालिसिसच्या आकडेवारीनुसार २०२० च्या तुलनेत २०२१मध्ये क्रिप्टाे चलनाच्या व्यवहारात ५६७ % वाढ हाेऊन ताे १५.८ लाख काेटी डाॅलर म्हणजे १,१८० लाख काेटी रुपयांवर गेला आहे. गेल्या वर्षी संपूर्ण जगाच्या जीडीपीच्या (जवळपास ९५ ट्रिलियन डाॅलर) १६.६ टक्के आहे.

वर्ष बेकायदेशीर चलन
२०१७ ३४,३५५
२०१८ ३२,८६१
२०१९ ८७,३८१
२०२० ५८,२५४
२०२१ १,०४,५५८

वर्ष क्रिप्टो मनी लाँड्रिंग
२०१७ ३२,११४
२०१८ २२,४०५
२०१९ ८१,४०६
२०२० ४९,२९२
२०२१ ६४,२२८

बातम्या आणखी आहेत...