आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Crypto Game Puts Hundreds Of Filipino Youth In Trouble; Youth Debt Market In Round Of The Game | Marathi News

तंत्रज्ञान:क्रिप्टो गेमने शेकडो फिलिपिन्स युवकांना लोटले संकटात ; गेमच्या फेऱ्यात युवक कर्जबाजारी

मनीला / चाड गुजमॅन, एंड्रूयू चो6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅमर्सन ओरियास गेल्या वर्षापर्यंत, फिलिपिन्सच्या ग्रामीण भागात जेवण बनवून दरमहा ६,००० रुपये (४००० पेसो) मिळायचे. एके दिवशी त्यांच्या मित्राने सांगितले की, तो आणि इतर काही मित्र क्रिप्टोकरन्सी-एनएफटीशी संबंधित गेम अॅक्सी इन्फिनिटी खेळून दरमहा ४७ हजार रुपये कमवत आहे. २६ वर्षीय ओरियास रात्री जागून अ‍ॅक्सी गेमच्या कार्टून राक्षसांशी लढायचे. लवकरच त्यानेही क्रिप्टोकरन्सीची कमाई सुरू केली. त्याचवेळी हजारो फिलीपिन्स तरुणांनी अॅक्सीत नशीब अजमावणे सुरू केले होते.

२०२१मध्ये क्रिप्टोकरन्सीतील बूममुळे फिलिपिन्समधील तरुणांनी श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहण्यास सुरुवात केले. ओरियाससह हजारो फिलीपिन्स खेळाडूंनी १४ महिन्यांनंतर गेम सोडून दिला. अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. क्रिप्टोच्या मूल्यात प्रचंड घसरण झाल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागला. ओरियास आणि अ‍ॅक्सी इन्फिनिटीची कथा क्रिप्टो जगाबद्दलच्या मोहक दाव्यांपासून सावध करते. ओरियास आणि इतर खेळाडू म्हणतात की, अॅक्सी इन्फिनिटीने त्यांच्यात खोट्या आशा निर्माण केल्या होत्या.

अॅक्सी इन्फिनिटी हे बरेच काही पोकेमॉन सारखे आहे. गेम खेळण्यासाठी, खेळाडूंना अॅक्सिस नावाचे कार्टून राक्षस विकत घ्यावा लागतो. ते इतर अॅक्सिसशी लढतात. या दरम्यान ते स्मूथ लव्ह पोशन (एसएलपी) नावाचे गेम चलन मिळवतात. तुम्ही ते इतर क्रिप्टोकरन्सीसोबत एक्स्चेंज करू शकता. प्रत्येक अॅक्सी राक्षस हे नॉन फंजिबल टोकन (एनएफटी) आहे.

साथीच्या रोगात हजारो नवीन खेळाडू गेमशी जुळले. निरीक्षक म्हणतात की गेमची आर्थिक रचना व्यवस्थित नाही. एसएलपीचे मूल्य कायम ठेवण्यासाठी, नवीन खेळाडूंना ते नियमितपणे खरेदी करत राहणे आवश्यक आहे. ही एक चिट फंडासारखी पॉन्झी योजना आहे. गेल्या वर्षी एसएलपीची किंमत वाढतच राहिली व नवीन खेळाडूंना अॅक्सिस खरेदी करणे शक्य नव्हते. यानंतर दुसरी योजना आली. श्रीमंत गुंतवणूकदारांनी अॅक्सी राक्षस विकत घेतले आणि कमिशनवर इतरांना उधार द्यायला सुरुवात केली. ३०% ते ५०% पैसे गुंतवणूकदारांच्या खिशात जातात. २०२२ मध्ये क्रिप्टो मूल्यात प्रचंड घट झाल्यामुळे गेम खेळण्यात काही अर्थ नव्हता. मार्चमध्ये, स्काय माव्हिसची ब्लॉकचेन रोनिनच्या हॅकिंगमुळे कंपनीचे ४७,००० कोटी रुपये नेटवर्कमधून गायब झाले. बहुतेक पैसे वापरकर्त्यांचे होते. मात्र, स्काय माव्हिसने संपूर्ण रक्कम परत केली आहे.

ब्लॉकचेनमधून आर्थिक परिवर्तनाचे स्वप्न दाखवले होते. ते आता हतबल झाले आहेत. अनेक खेळाडू म्हणतात, त्यांच्यावर लाखोंचे कर्ज आहे. गेममध्ये प्रवेश खरेदी करण्यासाठी त्याने प्रारंभिक गुंतवणूक म्हणून कुटुंब आणि मित्रांकडून पैसे उधार घेतले. शेवटी काहीच निष्पन्न झाले नाही. रात्री तासनतास अॅक्सी खेळणाऱ्या अनेक तरुणांनी आता हा गेम सोडला आहे.

गेम कंपनीला सर्वात जास्त फायदा
व्हिएतनामी कंपनी स्काय माव्हिस इनकाॅर्पोरेटेडने अॅक्सी इन्फिनिटी तयार केले आहे. लीग ऑफ लीजेंड्स आणि फोर्टनाइटसारख्या इतर गेममध्ये, मोठे खेळाडू स्ट्रीमिंगमधून प्रायोजकत्व आणि ऑनलाइन पैसे कमावतात. पण अॅक्सीमध्ये गेम खेळूनच पैसा मिळवला जातो. गेममध्ये होणाऱ्या व्यवहारांत स्काय माव्हिसचा हिस्सा असतो. कंपनीने गेल्या वर्षी गुंतवणूकदारांकडून सुमारे १२०० कोटी रुपये उभे केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...