आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय स्वयंपाकघरातील अत्यावश्यक भाग मानल्या जाणाऱ्या जिऱ्याच्या किमतीने पाच वर्षांतील उच्चांक गाठला आहे. काळी मिरीनंतर फक्त भारतातच नाही तर जगामध्ये जिरे हा दुसरा सर्वात लोकप्रिय मसाला आहे. जगातील ७० टक्के जिऱ्याचे उत्पादन भारतात होते, परंतु घटलेले एकरी क्षेत्र आणि अवकाळी पावसामुळे उत्पादनात ३५ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.
भारतातील उंझा बाजारात मार्चमध्ये जिऱ्याची आवक ६०% कमी झाली आहे, तर एप्रिलमध्ये दर वार्षिक आधारावर ७२ टक्क्यांनी वाढत आहेत. महिनाभरात जिऱ्याच्या दरात २० टक्के वाढ झाली आहे. मार्चमध्ये जिऱ्याचा भाव १७५-१८० रुपये किलो होता, तो २१५-२२० रुपये किलोवर पोहोचला आहे. क्रिसिल रिसर्चचे संचालक पुशन शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, जिऱ्याचे एकरी उत्पादन वार्षिक आधारावर सुमारे २१ टक्क्यांनी घटले आहे. दोन प्रमुख जिरे उत्पादक राज्यांमध्ये गुजरातमध्ये २०% व राजस्थानमध्ये १५% पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा उत्पादन सुमारे ३५ % घटून ५,५८० लाख टनांवर आले आहे. जागतिक स्तरावर जिऱ्याच्या किमतीही ५०% ते २.३४ युरो प्रतिकिलो वाढल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.