आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामायक्रोसॉफ्टने त्यांना १४ वर्षांपूर्वी भारतातून अमेरिकेत आणले. अभिषिक्त जैन यांनी कंपनीत प्रगती केली. ते कुटुंबासह चार बेडरूमच्या घरात राहू लागले. पण, ऑक्टोबरमध्ये तंत्रज्ञान उद्योगातील कपातीचे जैनही बळी ठरले. १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ते अमेरिकेत कायमस्वरूपी निवासी दर्जा मिळवण्याच्या जवळ होते. आता जैन यांच्यासमोर अनिश्चित भविष्य आहे. लवकरच दुसरी नोकरी किंवा ग्रीन कार्ड मिळाले नाही तर त्यांना अमेरिका सोडावी लागेल.
वर्षानुवर्षे वेगाने वाढ केल्यानंतर मंदीच्या छायेत अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्राला ब्रेक लागला आहे. तात्पुरता वर्क व्हिसा असलेल्या परदेशी लोकांना व्हिसा देऊ शकणाऱ्या कंपनीत नोकरी शोधण्यासाठी ६० दिवसांचा कालावधी असेल. या वर्षात आतापर्यंत एक लाख ४६ हजार तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. एकट्या नोव्हेंबरमध्ये ५१ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. नोकरी गमावलेल्यांमध्ये परदेशी लोकांची संख्या खूप जास्त आहे. हे लोक नवीन नोकरीच्या शोधात असतात. सिएटलमधील इमिग्रेशनच्या वकील तेहमिना वॉटसन म्हणतात की, मी याआधी इतक्या मोठ्या प्रमाणावर कपात कधीच पाहिली नाही. टेक कंपन्याही नोकऱ्या देत नाहीत. सिस्कोसारख्या आयटी कंपन्या, मेटासारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि अॅमेझॉनसारख्या ऑनलाइन रिटेल कंपन्यांसाठी सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या हजारो भारतीय अभियंत्यांपैकी अभिषिक्त जैन आहेत. अमेरिकन पदवीधरांच्या कमतरतेमुळे अनेक परदेशी कामगारांना त्यांच्या नियोक्ता कंपन्यांनी अमेरिकेत कायमस्वरूपी रहिवासी होण्यासाठी व्यवस्था केली आहे. त्यापैकी बहुतांश एच-१बी व्हिसावर राहतात. उच्च कुशल व प्रशिक्षित लोकांना हा व्हिसा मिळतो. अमेरिकेतील पाच लाखांहून अधिक लोक अशा व्हिसाखाली आहेत. त्यापैकी बहुतांश भारतीय आणि नंतर चिनी आहेत.
ट्विटरवर नोकरी गमावलेल्या भारतीय नागरिक सुजाता कृष्णमूर्ती सांगतात, यावर्षी गरोदर असूनही मी ट्विटरचे प्रायव्हसी फीचर तयार करण्यासाठी रात्रंदिवस काम केले. माझी एच-१बी स्थिती धोक्यात आल्याने माझी परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. एच-१बी व्हिसाधारकांना नोकऱ्या शोधण्यात मदत करण्यासाठी दोन भारतीय टेक कामगारांनी लिंक्डइनवर डेटाबेस तयार केला आहे. यावर ५०० हून अधिक लोकांनी आपली माहिती दिली आहे. आम्हाला ४०-५० लोकांशी संपर्क साधण्याची अपेक्षा होती, असे श्रुती आनंद सांगतात, त्यांनी विधी अग्रवालसह डेटाबेस तयार केला होता. पण, डेटाबेस तयार होताच पूर आला. दुसरीकडे वॉशिंग्टनमधील मायक्रोसॉफ्ट कंपनीने अभिषिक्त जैन यांना कपातीसाठी चांगले पॅकेज दिले आहे. या आठवड्यात त्यांना दिलासा मिळाला आहे. अचानक मेलमध्ये त्यांचे ग्रीन कार्ड आले. यामुळे त्यांचा अमेरिकेतील मुक्काम नोकरीवर अवलंबून राहणार नाही. आता तणाव कमी झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांना फक्त नोकरी शोधायची आहे. २० वर्षांत तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांची संख्या ४४% वाढली बहुतांश परदेशी हे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत. अमेरिकन अर्थव्यवस्थेचे तंत्रज्ञानावर जास्त अवलंबित्व असल्यामुळे अशा प्रतिभावंतांच्या मागणीत मोठी भर पडली आहे. २००० ते २०१९ दरम्यान अमेरिकेतील तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांची संख्या ७५ लाखांवरून ८० लाख झाली. ही वाढ ४४% आहे. प्रोग्रामिंग, कोडिंग आणि इतर कौशल्यांमुळे अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन सहा आकड्यांत असते. यावर्षी अमेरिकन कंपन्यांनी ८५,००० एच-१बी व्हिसासाठी ४,८०,००० अर्ज दाखल केले आहेत. इतर वर्षांप्रमाणे यंदाही सरकार लॉटरी पद्धतीने व्हिसा देणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.