आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Cyclonic Storm IMD Weather Alert Update; Heavy Rainfall Prediction In Goa, South Konkan And Gujarat; News And Live Updates

'तौकाटे' चक्रीवादळामुळे तीव्र पावसाचा अंदाज:दक्षिण कोकणासह गोवा, कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, तटरक्षक दल, सर्व एजन्सींना हाय अलर्ट

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या 3-4 दिवसांत महाराष्ट्रात हे चक्रीवादळ दाखल होण्याची शक्यता - हवामान‍ विभाग

हवामाने खात्याने भारताच्या किनारपट्टीच्या भागातून 'तौकाटे' नावाचे चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील दक्षिण कोकण विभाग, गोवा आणि कर्नाटक राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत किनारपट्टीच्या भागातील हवामानात बदल होऊ शकतो. त्यामुळे हवामान खात्याने तटरक्षक दल आणि सर्व एनन्सींना हार्य अलर्ट केले आहे. या चक्रीवादळाचे नाव 'तौकाटे' असून हे नवीन नाव म्यांमारमधून आलेले आहे.

येत्या 3-4 दिवसांत महाराष्ट्र तसेच गुजरात आणि गोव्याच्या किनारपट्टीवर हे नवीन 'तौकाटे चक्रीवादळ' येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी दक्षिण-पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.

अतिवृष्टीची भीती
या चक्रवादळामध्ये दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लगतच्या लक्षद्वीप प्रदेशात वायव्य दिशेकडे वेगाने जाण्याची क्षमता आहे. हे पाहता हवामान खात्याने महाराष्ट्रासह लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक, गोव्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हे चक्रीवादळ शनिवारी, 15 मे रोजी सकाळपर्यंत आणि पुढील 24 तासांत अधिक तीव्र होऊ शकते.

तटरक्षक दल, सर्व एजन्सींना हाय अलर्ट
समुद्रातील खराब परिस्थिती आणि मुसळधार पावसामुळे तेथील मच्छीमारांना मासे पकडू नका असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय तटरक्षक दलासह सर्व एजन्सी हाय अलर्टवर आहेत. चक्रीवादळामुळे पावसासह वादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...