आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:सायरस मिस्त्री म्हणाले, 2019 मध्ये टाटा समूहाला 13,000 काेटी ताेटा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टाटा समूहाला 2019 मध्ये 13,000 काेटी रुपयांचा निव्वळ ताेटा

सुमार कामगिरीचा हवाला देत टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार करण्यात आलेले सायरस मिस्त्री आणि टाटा समूह यांच्यात सुरू असलेल्या वादाने आता नवीन वळण घेतले आहे. टाटा समूहाला २०१९ मध्ये १३,००० काेटी रुपयांचा निव्वळ ताेटा झाला हाेता. हा गेल्या तीन दशकांतील सर्वात माेठा ताेटा असल्याचे प्रतिज्ञापत्र मिस्त्री यांनी सर्वाेच्च न्यायालयाकडे सादर केले आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एनएसीएलटी पूर्वस्थिती आदेशाला आव्हान देणाऱ्या टाटांच्या याचिकेला मिस्त्री यांनी उत्तर दिले आहे. याअगाेदर जानेवारीमध्ये टाटा यांनी १८ डिसेंबर २०१९ मधील राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलात लवादाच्या आदेशाला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले हाेते.

0