आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूक मंत्र:नवीन वर्षात महागाई वाढल्याने डेट, सोन्यात होऊ शकते चांगली कमाई

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इक्विटी मार्केटसाठी २०२१ आणि २०२२ चांगले होते. अर्थव्यवस्थेला महामारीच्या आव्हानात्मक स्थितीतून बाहेर पडण्यासाठी केंद्रीय बँकांनी स्वसत आणि सोपे कर्ज उपलब्ध करुन दिले. मात्र आता ही सुविधाही संपत चालली आहे. देशात, महागाईचा दर काही महिन्यांच्या उंचीवर आहे, परंतु अनेक देशांमध्ये तो ४०-५० वर्षांच्या विक्रमी पातळीवर आहे. यात रशिया-युक्रेन युद्धाचाही मोठा वाटा आहे. अशात अमेरिकी फेड आणि आरबीआयसह बऱ्याच देशाच्या केंद्रिय बँकांनी व्याज दर वाढवले. त्यामुळे अमेरिका आणि युरोपसारख्या देशांच्या शेअर बाजारात भारी घसरण आली. दरम्यान, सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला असला तरी समभागांमध्ये केवळ ५% वाटा आहे.

इक्विटी सोडू नका
इक्विटीमध्ये रिस्क वाढली आहे, मात्र त्यात थोडी गुंतवणूक राखणे ही चांगली रणनीती असेल. कॉर्पोरेट नफा-जीडीपी गुणोत्तर सध्या दशकाच्या उच्चांकावर आहे. म्हणजे कंपन्यांना क्षमता विस्तारासाठी वाव आहे, जो सध्या ७२% आहे. क्षमता वाढल्याने व्यवसाय वाढेल.

अल्पकालीन कर्ज निधी
सध्याच्या परिस्थितीत, डेट (बॉन्डसारखे) फंड अधिक चांगले दिसतात. उच्च चलनवाढ आणि वाढत्या व्याजदरामुळे बाँडचे उत्पन्न जानेवारीतील ६.६% वरून ७.२५% झाले. हा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे शॉर्ट टर्म डेट फंडातील गुंतवणूक ही एक उत्तम गुंतवणूक ठरू शकते.

सोन्यावरील विश्वास वाढला
२०२३ मध्ये सोने उत्तम मालमत्ता श्रेणीत येईल. क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये तेजी आल्यानंतर सोन्यातील गुंतवणूक वाढत आहे. सध्याच्या ५४,००० रुपयांच्या पातळीवरही, सोने त्याच्या विक्रमी पातळीपेक्षा २१०० रुपये खाली आहे. केंद्रीय बँकांची भूमिकाही सोन्याला साथ देणारी आहे.

डायनॅमिक बाँड फंड
गुंतवणूकदार डायनॅमिक बाँड फंड घेऊ शकतात. १-२ वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर या श्रेणीतील फंड १०% पेक्षा जास्त परतावा देऊ शकतात. लिक्विड आणि अल्ट्रा-शॉर्ट टर्म फंड हे व्याजावर आधारित कोणत्याही पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा चांगले सिद्ध होतील. महागाई जास्त असेल तर अशा फंडांचा परतावा सहसा वाढतो.

मल्टी अॅसेट फंड
तुम्हाला वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांच्या साधक-बाधक गोष्टींमध्ये अडकायचे नसेल, तर तुम्ही मल्टी अॅसेट फंडांचाही विचार करू शकता. त्याचे फंड व्यवस्थापक एकाच वेळी गुंतवणुकीची रक्कम इक्विटी, डेट आणि सोने यासह इतर मालमत्ता वर्गांमध्ये वाटप करतात. हे तुमच्यासाठी सोयीचे असेल.

बातम्या आणखी आहेत...