आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • December 21 Share Market News Updates : The Biggest Fall In Share Maeket Since May 4, The Sensex Fell By 1600 Points

शेअर मार्केट:4 मे नंतर सर्वात मोठी घसरण, सेन्सेक्स 1600 अंकांनी कोसळला; BSEची मार्केट कॅप 6 लाख कोटींनी कमी झाली

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याआधी 4 मे रोजी सेन्सेक्स 2002 अंकांनी कोसळला होता
  • रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 4% घसरण

शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. BSE सेन्सेक्स दुपारी 1600 अंकांनी घसरून 45,347 अंकावर व्यापार करत आहे. याआधी 4 मे रोजी सेन्सेक्स 2002 अंकांनी घसरला होता. इंडेक्स 32,748 अंकांनी सुरू होऊन 31,715 अंकांवर बंद झाला होता. दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअरमध्ये 4% घसरण झाली. सकाळी हा 2% वर होता. शुक्रवारी BSE चे एकूण मार्केट कॅप 185 लाख कोटी रुपये होते. जे आज 6 लाख कोटी रुपयांनी घसरून 178 लाख कोटी रुपयांवर आला आहे.

दुपारनंतर अचानक बाजारात घसरण सुरू झाली. बाजाराच्या ऐतिहासिक तेजीत गुंतवणूकदारांनी नफा मिळविणे सुरू केले आहे. जागतिक पातळीवर काही देशांमध्ये लॉकडाऊन आणि कोरोना प्रकरणात वाढ झाल्यामुळे बाजारावर परिणाम दिसून येत आहे.

इंडेक्समध्ये घसरणीला RIL, बजाज, इंडसइंड बँक, HDFC आणि SBI, M&M चे शेअरला लीड करत आहेत. BSE मध्ये एकूण 3,089 शेअर्चचा व्यापार होत आहे. यापैकी 2,024 कंपन्यांचे शेअर घसरणीसोबत व्यापार करत आहेत. अर्थात एकूण 65% शेअर्समध्ये घसरण आहे. BSE मध्ये जेट एअरवेजचे शेअरला लोअर सर्किट लागले. शेअर 5% खाली 105.95 रुपयांच्या दरावर पोहोचले आहे.

दुसरीकडे निफ्टी 227.45 अंकांच्या खाली 13,533.10 अंकावर व्यापार करत आहेत. बाजारात निफ्टी बँक इंडेक्स 801 अंकांनी कोसळत 29.913 वर व्यापार करत आहेत. यामध्ये फेडरल बँकेचे शेअर 6% खाली व्यापार करत आहते. तर IT सेक्टरमध्ये तेजी आहे. याशिवाय निफ्टी मेटल इंडेक्स 3% खाली व्यवसाय करत आहेत. इंडेक्समध्ये हिंदुस्तान कॉपरचे शेअर 7% सर्वाधिक घसरणीसोबत व्यापार करत आहे. सकाळी BSE सेन्सेक्स 28.51 अंकांनी खाली 46,932.18 वर आणि निफ्टी 18.65 अंकांनी खाली 13,741.90 वर सुरु झाला होता.

बातम्या आणखी आहेत...