आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • December Month GST Collection Latest News | Grow 15 Percent 1.49 Lakh Crore Rupees | Ministey Of Finance

सलग 10व्या महिन्यात विक्रम:डिसेंबर महिन्यात GST संकलन 15% वाढले, सरकारच्या तिजोरीत 1.5 लाख कोटी जमले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत सरकारने डिसेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा कर (GST) मधून 1.5 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. अर्थ मंत्रालयाच्या वतीने रविवारी ही माहिती जाहीर केली. नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात जीएसटी संकलनात 2.5% वाढ झाल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हणणे आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये एकूण GST संकलन 1.46 लाख कोटी रुपये होते.

डिसेंबरमध्ये जीएसटी कलेक्शन 15 टक्क्यांनी वाढले
दरम्यान, डिसेंबर 2021 च्या तुलनेत डिसेंबर 2022 मध्ये जीएसटी संकलनात 15.2% वाढ झाली आहे. डिसेंबर 2021 मध्ये एकूण जीएसटी संकलन 1.3 लाख कोटी रुपये होते. डिसेंबर 2022 ची आकडेवारी समोर आल्यानंतर एक नवा विक्रमही तयार झाला आहे. सलग 10 व्या महिन्यात जीएसटी संकलन 1.4 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. एप्रिलमध्ये, जीएसटी संकलनाने सुमारे 1.68 लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. त्याचवेळी, ऑक्टोबरमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च जीएसटी संकलन 1.52 लाख कोटी रुपये होते.

डिसेंबरमध्ये केंद्रीय जीएसटी 26,711 कोटी होता

डिसेंबर 2022 मध्ये केंद्रीय जीएसटी 26,711 कोटी रुपये होता. तर राज्य जीएसटी 33,357 कोटी रुपये होता. तर एकात्मिक जीएसटी 78,434 कोटी रुपये आणि उपकर 11,005 कोटी रुपये होता. सरकारने एकात्मिक जीएसटीमधून केंद्रीय जीएसटीमध्ये 36 हजार 669 कोटी रुपये आणि राज्य जीएसटीसाठी 31,094 कोटी रुपये सेटल केले आहेत.

या समझोत्यानंतर डिसेंबर महिन्यात केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल अनुक्रमे 63,380 कोटी आणि 64,451 कोटी रुपये होता. नोव्हेंबर महिन्यात 7.9 कोटी ई-वे बिले झाली. जी ऑक्टोबरमध्ये निर्माण झालेल्या 7.6 कोटी ई-वे बिलांपेक्षा खूप जास्त झाली.

बातम्या आणखी आहेत...