आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Deception Of People From Foreign Exchange Trading Platforms; Don't Forget Scams RBI | Marathi News

बँकेचा इशारा:फॉरेन एक्स्चेंज ट्रेडिंग प्लॅटफॉर्मकडून लोकांची फसवणूक; घोटाळ्यांचे कुरण, फसव्या जाहिरातींना भुलू नका

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परकीय चलनात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला रिझर्व्ह बँकेने दिला आहे. विशेषतः अलीकडच्या काही महिन्यांत माेठ्या प्रमाणावर उदयास आलेल्या आणि लाेकांना उच्च परतावा देण्याचे आश्वासन देणाऱ्या अशा अनधिकृत फाॅरेन एक्स्चेंज प्लॅटफॉर्मच्या विरोधात सावधगिरी बाळगली जात आहे. जे अलीकडच्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात उदयास आले आहेत आणि लोकांना उच्च परतावा देण्याचे आश्वासन देत आहेत.

रिझर्व्ह बँकेने एक निवेदन प्रसिद्ध करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, सर्च इंजिन,आेटीटी प्लॅटफॉर्म आणि गेमिंग अॅप्सवर अनधिकृत ईटीपीच्या अनेक दिशाभूल करणाऱ्या जाहिराती येत आहेत. अनधिकृत ट्रेडिंग प्लॅटफॉर्म लोकांना वैयक्तिक संपर्क चलनामध्ये व्यापार करून माेठा नफा कमावून देण्याची लालूच दाखवत आहेत. यासंदर्भात घाेटाळ्याच्या तक्रारी येत असून त्यात गुंतवणूक करणाऱ्यांचे कष्टाचे पैसे बुडत आहेत.

देशात परकीय चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करता येता, परंतु विशिष्ट हेतूंसाठी रिझर्व्ह बँकेने अधिकृत केलेल्याच इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मद्वारेच. लोकांनी केवळ अधिकृत व्यक्तींसोबतच विदेशी चलनात व्यवहार करावेत. हे व्यवहार फेमा अंतर्गत विहित केलेल्या उद्देशांसाठीच केले पाहिजेत असे रिझर्व्ह बँकने स्पष्ट केले आहे.

फॉरेक्स ट्रेडिंग फक्त रिझर्व्ह बॅँकेच्या अधिकृत ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरून करता येते
- अधिकृत व्यक्ती कोण आहेत?
हे असे लोक किंवा संस्था आहेत ज्यांना रिझर्व्ह बँकेने फॉरेक्समध्ये व्यवहार करण्याची परवानगी दिली आहे. हे अधिकृत वितरक, मनी चेंजर्स किंवा परदेशी बँकेचे युनिट असू शकतात. त्यांची यादी रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटवर आहे.
- इंटरनेट/इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग पोर्टलवर भारतीय चलनात व्यवहार करू शकतो का?
होय, परंतु केवळ फेमा अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या उद्देशांसाठी अधिकृत ईटीपीद्वारे. याशिवाय एनएसई, बीएसई आणि मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाद्वारे (एमएसई) चलन व्यवहार केले जाऊ शकतात.
- ईटीपी म्हणजे काय? त्यांना भारतात काम करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी लागते का?
इटीपी(इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म) ही मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंज तसेच शेअर्स, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स किंवा परकीय चलन यांचा व्यापार केला जाऊ शकतो. व्यवहार करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी लागते.

दंड भरावा लागू शकतो
आरबीआयच्या निवेदनात म्हटले आहे की, फेमाअंतर्गत निर्दिष्ट केलेल्या उद्देशांव्यतिरिक्त किंवा अनधिकृत ईटीपी व्यवहारांद्वारे विदेशी चलनातील व्यवहारांवर विदेशी चलन कायद्यांतर्गत दंड आकारला जाऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...