आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Decline In Gold Demand In India China, Continued Demand For Investment; Report Of The World Gold Council

कोरोनाचा परिणाम:भारत-चीनमध्ये सोन्याच्या मागणीत घट, गुंतवणुकीसाठी ग्राहकी कायम; वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचा अहवाल

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे कमी राहील सोन्याची मागणी, अर्थव्यवस्थेच्या सुधारणेवर अवलंबून असतील दर

जगातील सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक असलेला भारत आणि चीनमध्ये सोन्याची मागणी वाढली आहे. तथापि, या अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित गुंतवणुकीमुळे ग्राहकांच्या मागणीतील कमतरता भरून निघाली आहे. मात्र, तरीही कोरोना महामारीच्या संकटामुळे या सहामाहीत सोन्याची मागणी कमकुवत राहील, असा अंदाज वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (डब्ल्यूसीजी) एका अहवालात वर्तवला आहे.

या अहवालानुसार, या महामारीचा व्यवसाय आणि उत्पन्नावर विपरीत परिणाम झाल्याने सोन्याच्या मागणीतही कमी झाली. तथापि, अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी घोषित केलेल्या आर्थिक पॅकेजचा परिणाम चांगला झाल्यास कोरोना संकटाचा नकारात्मक परिणाम काही प्रमाणात कमी होणे शक्य आहे. डब्ल्यूजेसीच्या ‘गोल्ड मिड-टर्म २०२०: सुधारणेचा मार्ग आणि कामगिरी’ अहवालात आर्थिक हालचाली मर्यादित असतील. तसेच वाढती बेरोजगारी आणि घटत्या उत्पन्नामुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी २०२० च्या दुसऱ्या सहामाहीत कमकुवत राहील असे म्हटले आहे.

२०२० च्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ११ वर्षांतील नीचांकावर आल्याचे अहवालात म्हटले आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एकूण व्याजदरात १.१५ टक्के कपात केली आहे. याशिवाय अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी सरकारने २१ लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. या उपायांमुळे वित्तीय तूट वाढण्याची भीती आहे. गुंतवणूकदार अजूनही इक्विटीमध्ये गुंतवणूक करत आहेत.

अर्थव्यवस्थेच्या सुधारणेवर अवलंबून असतील दर

अहवालानुसार, सोन्याच्या किमतीतील वाढ किंवा घट हे अर्थव्यवस्थेच्या सुधारणेची गती आणि व्याप्तीवर अवलंबून असणार आहे. तथापि, सध्याच्या जागतिक आर्थिक वातावरणात तीन घटक सोन्याच्या गुंतवणुकीच्या मागणीला पाठबळ देत आहेत. धोका आणि अनिश्चितता, किंमत आणि मूल्य आहेत हे तीन घटक आहेत. यामुळे गुंतवणूकदार पहिल्या सहामाहीप्रमाणेच सोन्यातील गुंतवणूक सुरू ठेवू शकतात. तसेच, अर्थव्यवस्थेच्या सद्य:स्थितीमुळे दागदागिने किंवा दीर्घकालीन बचतीच्या स्वरूपात सोन्याची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. विशेषत: चीन आणि भारत यासारख्या प्रमुख सोन्याच्या बाजारापेठांमध्ये हे चित्र दिसू शकते.