आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या वर्षापर्यंत व्हेंचर कॅपिटल शिखरावर होते. अमेरिकेत व्याजदर शून्याच्या जवळ होते. मोठ्या कंपन्या, हेज फंड्स आणि गुंतवणूकदारांनी नव्या कंपन्यांमध्ये पैसे लावणे सुरू केले होते. २०२१ मध्ये स्टार्टअपमध्ये ५२ लाख कोटी रुपये लावण्यात आले होते. यानंतर महागाईत उसळी आणि व्याजदरात वाढीने बाजार उद्ध्वस्त केला. गेल्या वर्षी जगभरात स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक एक तृतीयांश कमी झाली. २०२१ ची अंतिम तिमाही आणि २०२२ मध्ये याच कालावधीत खासगी कंपन्यांचे मूल्य ५६% खाली आले. तंत्रज्ञान कंपन्यांनी मोठी घसरण पाहिली.
याची तुलना २०००-०१ मध्ये डॉटकॉम कंपन्यांशी होणे स्पष्ट आहे. त्या वेळी व्हेंचर कॅपिटल गुंतवणूक थांबली होती. सुदैवाने आज तशी स्थिती नाही. नव्या कंपन्यांचा ताळेबंद वीस वर्षांपूर्वीपेक्षा जास्त मजबूत आहे. एकट्या अमेरिकेत व्हेंचर कॅपिटलिस्टकडे २० लाख कोटी रुपये जमा आहेत. तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये घसरणीतून आता उद्योग बाहेर येत आहे. पैसे लावणाऱ्या कंपन्या जुन्या पद्धतींवर परतल्या आहेत. गुंतवणूकदारांनी लहान, नफा कमावणाऱ्या कंपन्यांवर लक्ष दिले आहे. टेक कंपन्यांमध्ये वाढीच्या काळात गुंतवणूकदार ही कला विसरले होते. आजच्या नफ्याची जागा मोठ्या नफ्याने घेतली होती. गोल्डमॅन सॅक्स बँकेच्या एका निर्देशांकानुसार नोव्हेंबर २०२१ नंतर नफा कमावणाऱ्या कंपन्यांचे शेअर मूल्य दोन तृतीयांश घटले आहे. व्हेंचर कॅपिटल कंपन्यांनी अशा नव्या कंपन्यांवर डाव लावला आहे, ज्यांनी खर्च घटवला आणि त्या लवकरच फायद्यात येण्याची शक्यता आहे.
गुंतवणूक कंपन्या धोरणात्मक महत्त्व असलेल्या कंपन्यांकडे अधिक लक्ष देत आहेत. आधी या कंपन्या अशा सेमीकंडक्टर कंपन्यांमध्ये पैसे लावायच्या, ज्यांना मोठे सरकारी कंत्राट मिळायचे. आज त्यांचा डोळा सरकारी मदत मिळणाऱ्या कंपन्यांवर आहे. अमेरिका, युरोपमध्ये सरकारे चिप आणि ग्रीन एनर्जी कंपन्यांना अब्जावधी रुपये देत आहेत. शासकीय मदत मिळणाऱ्या कंपन्यांना महत्त्व सिलिकॉन व्हॅलीची प्रमुख इन्व्हेस्टमेंट कंपनी अँड्रिसन होरोव्हिट्झने अमेरिका डायनिझम फंड लाँच केला आहे. तो शासकीय अनुदान मिळणाऱ्या कंपन्यांत गुंतवणूक करतो. सिंगापूरच्या सॉव्हरीन वेल्थ फंड टेमासेकसह इतर व्हेंचर गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे की, त्यांची गुंतवणूक सरकारच्या महत्त्वाच्या लक्ष्यांशी जुळली आहे. व्हेंचर कॅपिटल कंपन्यांचा जोर चांगल्या व्यवस्थापनावर आहे. आता गुंतवणूक मिळवणे सोपे नाही. टायगर ग्लोबल आणि इतर फंड मागे हटू लागले आहेत. इतर गुंतवणूकदार म्हणतात की, त्यांना कंपनीच्या मंडळात जागा हवी. यामुळे संस्थापकांची शक्ती कमी होईल आणि कंपनीचे व्यवस्थापन चांगले होईल. गुंतवणूक कंपन्यांनी एफटीएक्ससारख्या क्रिप्टोकरन्सी कंपन्या कोसळल्याने धडा घेतला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.