आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर ऑप्शन:एनएसडी आणि एफटीआयआयची पदवी व प्रशिक्षण तुमच्या सर्जनशीलतेला यशापर्यंत पोहोचवतील

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूटन, चक्रव्यूहसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांत भूमिका केलेली बॉलीवूड अभिनेत्री अंजली पाटील अभिनयासोबतच विविध भाषांतील चित्रपटांचे दिग्दर्शनही करते. आपल्या कामाच्या बळावर अंजलीने या क्षेत्रात आपली ओळख बनवली आहे. अटकन-चटकन चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे शिव हारे यांना साऊथ लंडन फिल्म फेस्टिव्हल आणि जयपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार मिळाला आहे. गँग्स ऑफ वासेपूरचे पटकथा लेखक झीशान कादरी हे ओळख उत्कृष्ट संवादलेखक म्हणून ओळखले जातात. अभिनय, दिग्दर्शन, लेखनासारख्या सर्जनशील क्षेत्रात आता अंजली, शिव आणि झीशानसारख्या तरुणांची संख्या वाढत आहे. ते अधिकृतपणे पदवी प्राप्त करून कारकीर्द घडवत आहेत. उदाहरणादाखल पाहायचे झाल्यास, मिर्झापूर वेबसिरीजमध्ये आपल्या अभिनयाद्वारे वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दिव्येंदू शर्मा याने भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्थेतून (पुणे) शिक्षण घेतले आहे. चित्रपट, टीव्हीसह ओटीटी प्लॅटफॉर्मने तरुणांना नव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या संधी फक्त अभिनय, दिग्दर्शनापुरत्या मर्यादित नाहीत. व्हिडिओ एडिटर्स, कंटेन्ट रायटर, मेकअप आर्टिस्ट, कला दिग्दर्शक, क्रिएटिव्ह एडिटर आदींसाठीही चांगल्या संधी आहेत. जॉब वेबसाइट इनडीडच्या अनुसार, या सर्व नोकऱ्यांचे सरासरी वेतन मुख्य प्रवाहातील इतर नोकऱ्यांपेक्षा अधिक आहे.

एफटीआयआयमध्ये शॉर्ट टर्म कोर्सेससाठी अभ्यासक्रमाची प्रक्रिया सुरू आहे ओटीटीमुळे सिनेमॅटोग्राफ्रर्सना संधी वाढल्या २०२१ मध्ये ओटीटीवर जवळपास ४०० भारतीय चित्रपट आणि वेबसिरीज प्रदर्शित झाल्या. त्यामुळे सिनेमॅटोग्राफरची मागणी वाढत आहे. सिनेमॅटोग्राफीमध्ये यूजी-पीजी डिप्लोमासह ग्रॅज्युएशन कोर्सही केला जाऊ शकतो. सिनेमॅटोग्राफीसाठी एआयएफटी-मुंबई, एमआयटी-पुणे, एमजीआर-चेन्नई, एएएफटी-नोएडा आदी प्रमुख संस्था आहेत. येथे विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओग्राफी, व्हिडियो एडिटरच्याही संधी आहेत.

एडिटिंग, आर्ट डायरेक्शन अॅँड प्रॉडक्ट डिझाइन, स्क्रीन अॅक्टिंग, स्क्रिन रायटिंग आदी अभ्यासक्रम एफटीआयआयमध्ये ऑफलाइन उपलब्ध आहेत. एफटीआयआयमध्ये प्रवेशपरीक्षेद्वारे प्रवेश घेता येतो. याशिवाय या संस्थेत वीकेंड किंवा रात्रीच्या वेळी विविध शॉर्ट कोर्सेस ऑनलाइन उपलब्ध आहेत. उदा. स्मार्ट फोन डॉक्युमेंट्रीचा बेसिक कोर्स एफटीआयआय १२ ते २१ सप्टेंबरदरम्यान रात्री ७ ते ९ या वेळेत ऑनलाइन आयोजित करणार आहे. यासाठी एक सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येईल. स्क्रीन प्ले रायटिंगच्या वीकेंड कोर्ससाठी ८ अॉगस्टपर्यंत अर्ज करता येईल.

एनएसडीमध्ये प्रवेशासाठी रंगमंचाचा अनुभव आवश्यक एनएसडीमध्ये ड्रॅमॅटिक आर्टचा तीनवर्षीय पीजी डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहे. विद्यार्थ्याने सहा वेगवेगळ्या थिएटर प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम केलेले असणे, हे येथे प्रवेशासाठी आवश्य आहे. यासोबतच एखाद्या थिएटर एक्सपर्टचे शिफारपत्रही असावे लागते. प्रवेश परीक्षेद्वारे एनएसडीमध्ये प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी एनएसडीची अधिकृत वेबसाइट पाहात राहा. याशिवाय या क्षेत्रात अॅडव्हर्टायझिंग मॅनेजर, पब्लिक रिलेशन मॅनेजर, फॅशन डिझायनर आदी पदांसाठीही मागणी वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...