आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समन्स जारी:दिल्ली हायकोर्टाने ‘भारत पे’चे सहसंस्थापक ग्रोव्हर यांना जारी केले समन्स

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत पेचे सहसंस्थापक अशनीर ग्रोव्हर आणि त्यांच्या पत्नी माधुरी जैन यांना दिल्ली हायकोर्टाने समन्स जारी केले आहे. फिनटेक कंपनीने कोर्टात याचिका दाखल करून या दोघांविरुद्ध चुकीचे व वाईट हेतूने अभियान चालवल्याचा आरोप केला होता. याच याचिकेवरून हे समन्स पाठवण्यात आले आहे. भारत पेच्या संचालक मंडळाशी कायदेशीर लढाई लढणारे ग्रोव्हर यांनी याच वर्षी एप्रिलमध्ये व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर माधुरी जैन यांनाही निधीचा गैरवापर केल्यावरून हेड ऑफ कंट्रोल पदावरून हटवण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...