आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाेराेना संकटात घटलेल्या मागणीमुळे पिचलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला दिलासा देणारी बातमी आहे. ग्राहकांची नेमकी नस आेळखणाऱ्या एका ताज्या सर्वेक्षणात लाॅकडाऊनमध्येही परवडणाऱ्या घरांची मागणी कायम असल्याचे दिसून आले आहे. इतकेच नाही तर भांडवल बाजारातील वाढती अनिश्चितता बघता आता गुंतवणूकदारांची उत्पन्नाचा आेघ कायम राहण्यासाठी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून मालमत्ता भाड्याने घेण्याची मानसिकता आहे. माेठी गाेष्ट म्हणजे भाड्याच्या घराला प्राधान्य देणारे मिलेनियल्स आता स्वत:चे घर असण्याचा विचार करत आहेत. एनाराॅक प्राॅपर्टी कन्सल्टंट या मालमत्ता सल्लागार कंपनीने २० ते २७ एप्रिल या लाॅकडाऊन कालावधीत देशातल्या १४ शहरांमधील २४ ते ६७ वयाेगटातील लाेकांचे आॅनलाइन सर्वेक्षण केले. त्यात २४ - ३५ वयाेगटातील ४८% लाेकांनी गुंतवणुकीसाठी रिअल इस्टेटला पसंती देताना घर खरेदीची इच्छा व्यक्त केली.
यामध्ये ५९ % लाेकांनी या घरात राहण्याची मनीषा व्यक्त केली. परवडणाऱ्या घरांची मागणी पहिल्यासारखीच असल्याचे दिसून आले. ३७% लाेकांनी आधीच्या सर्वेक्षणाप्रमाणेच ४५ लाखांचे बजेट घर खरेदी करणे पसंत केले. आतापर्यंत स्वत: राहणारे लाेक तयार घराला पसंती देत हाेते, आता गुंतवणूकदारही त्याच मार्गाने जात आहेत. आधीच्या सर्वेक्षणातील २२ % तुलनेत ३४ % गुंतवणूकदार ‘रेडी टू मूव्ह’ घरासाठी इच्छुक आहेत. बांधकाम क्षेत्रातील घडामाेडी आटल्याने गुंतवणूकदार जाेखीम पत्करणे टाळत आहेत. काेराेनामध्ये स्थावर मालमत्तेचे मालक हाेणे सुरक्षेचे आहे. अनिश्चिततेनुसार प्राधान्यक्रम ठरत असल्याचे एनाराॅकचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले.
लाेकांना नकाे आहे गुणवत्तेशी तडजाेड
काेराेनामुळे लाेकांच्या इच्छाशक्तीवर परिणाम झाला आहे. ते जाेखीम कमी असलेल्या सुस्थापित व संघटित विकासकांकडून घर खरेदीला प्राधान्य देत आहे. अशा खरेदीदारांचे प्रमाण ५२ % वरून ६२ % झाले आहे. विकासकांशी तडजाेड करण्यापेक्षा गुणवत्तेसाठी जास्त रक्कम माेजण्याची त्यांची तयारी आहे. १४% लाेकांनी सरकारी संस्थांनी बनवलेल्या घरांना प्राधान्य देत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.