आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरात फूड सप्लिमेंट्सची मागणी कमी होऊ लागली आहे. कोरोनाच्या काळात त्यांची विक्री झपाट्याने वाढली होती, पण नेस्लेच्या फूड सप्लिमेंट्सची विक्री २०२२ च्या पहिल्या नऊ महिन्यांत साधारणपणे सपाट राहिली आहे. पुढील वर्षाच्या उत्तरार्धातही १०% पेक्षा जास्त विक्रीची अपेक्षा नाही. हॉर्लिक्ससारखी उत्पादने बनवणारी कंपनी रेकिट बेंकिसरसारख्या कंपन्यांनाही असा सामना करावा लागत आहे. समस्या अशी आहे की, नेस्ले आणि युनिलिव्हरारख्या एफएमसीजी दिग्गजांनी अलीकडच्या वर्षांत व्हिटॅमिन ब्रँड्स मिळवण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. याद्वारे ती स्टॉक क्यूब्स (डिहायड्रेटेड मीट), आइस्क्रीम आणि साबण यांसारख्या पारंपरिक व्यवसायाच्या पलीकडे व्यवसाय विस्तारण्याच्या शक्यता शोधत आहे. कोविड-१९ साथीचा रोग उद्भवला तेव्हा हा डाव यशस्वी झाल्याचे पाहिले. कोरोनापासून संरक्षण आणि वाढती प्रतिकारशक्ती या चिंतेत ग्राहकांनी लगेचच व्हिटॅमिन ब्रँड्स घेतले. पण एका वर्षात, महागाईमुळे अन्नपूरक पदार्थांची विक्री मंदावली आहे.
यूएसमध्ये विक्रीत ३ टक्क्यांवर घट: डेटा प्रदाता नीलसन आईक्यूच्या मते, अमेरिकेत जीवनसत्त्वे, खनिजे व पूरक पदार्थांची विक्री ३.३ % ने घटली. आगामी काळ आव्हानात्मक असणार आहे, असा इशारा नेस्लेने दिला आहे.
युनिलिव्हरने चार वर्षांत सात व्यवसायांचे केले अधिग्रहण खाद्यपदार्थांची मागणी कमी झाल्यामुळे कंपन्या नवीन क्षेत्रात आपले हात आजमावत आहेत. उदाहरणार्थ, युनिलिव्हर पीएलसीने २०१८ पासून ७ व्यवसाय खरेदी केले आहेत. त्याचा लक्झरी स्किन केअर व्यवसाय दुहेरी अंकाच्या पटीने वाढत आहे.नेस्लेच्या प्यूरिनासारख्या ब्रँडची विक्री सतत वाढत आहे; परंतु आरोग्य व्यवसायात या गटाचा प्रवेश आव्हानात्मक आहे. नेस्लेने दोन वर्षांपूर्वी शेंगदाणा-अॅलर्जी उपचार पालफोर्जिया विकत घेतला. गेल्या आठवड्यातच कंपनीने ते बाजारात आणले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.