आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:भारतात या वर्षात वेगानेवाढेल सोन्याची मागणी, कोरोना लसीकरणात स्थिती बदलेल

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महारोगराईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे २०२० मध्ये सोन्याची मागणी कमकुवत राहिली होती. मात्र, या वर्षी देशातील बाजारात सोन्याच्या मागणीत वेगाने वाढ होईल. जागतिक सुवर्ण परिषदेनुसार(डब्ल्यूजीसी) १६ जानेवारीपासून देशात कोरोना महारोगराई रोखण्यासाठी लसीकरण सुरू झाल्यावर स्थिती वेगात बदलेल आणि सोन्याच्या मागणीत वाढ होईल. भारतात डब्ल्यूजीसीचे एमडी सोमसुंदरम पी.आर. यांनी एका मुलाखतीत सांगितले की, महारोगराईमुळे गेल्या वर्षी जे विवाह लांबणीवर टाकले, ते या वर्षात होतील.

यामुळे दागिन्यांची खरेदी वाढेल आणि त्यामुळे सोन्याची मागणी जोर पकडेल. त्यांनी सांगितले की, सध्याची स्थिती संकेत देत आहे की, २०२१ मध्ये सोन्याची मोठी मागणी होईल. एखाद्या घटनेमुळे परिणाम होऊ शकतो, परंतु सध्या तशी स्थिती दिसत नाही. भारतात चीननंतर सोन्याची सर्वात जास्त विक्री होते. २०२० मध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लावलेल्या देशव्यापी टाळेबंदीत किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्यामुळे देशातील बाजारात सोन्याच्या मागणीत घट आली होती. काही महिन्यांत स्थितीत वेगवान सुधारणा होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...