आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Demand For Gold Increased By 43 Percent And Jewelery By 49 Percent In Three Months.

सणासुदीत सराफा बाजार फुलणार:तीन महिन्यात सोन्याची 43 अन् दागिन्यांची ४९ टक्क्यांनी मागणी, देशातीेल पहिले गोल्ड एक्सचेंज आज

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) च्या अहवाल गुरूवारी जाहीर झाला असून यातून भारतात लोक सोने परिधानच करित नाही तर सोने त्यांच्या रक्तात भीनल्याचे बोलले जाते. एका अर्थाने याची पुष्टीच या अहवालातून झाली आहे. यावर्षी एप्रिल ते जून दरम्यान देशातील सोन्याची मागणी 43 टक्क्यांनी वाढून 171 टन झाली आहे. गेल्या वर्षी याच तीन महिन्यांत मागणीकेवळ 120 टन होती. त्याचवेळी सोन्याच्या दागिन्यांचीही मागणी 49 टक्क्यांनी वाढून 140.3 टन झाली आहे.

गेल्या वर्षी ते फक्त 94 टन होते. तथापि, या कालावधीत सोन्याची जागतिक मागणी ८ टक्क्याने घटून 948.8 टन झाली आहे. 2021 मध्ये याच कालावधीत ते 1,031.8 टन होती. डब्ल्यूजीसीचे सीईओ (भारत) पी. आर. सोमसुंदरम ​​ यावर्षी जून हा अक्षय तृतीयेसोबत लग्नाचा हंगाम होता. त्यामुळे देशाअंतर्गत मागणी वाढली. शेअर बाजारातील अस्थिरता. वाढती महागाई पाहून लोकांनी सोने सुरक्षित समजून त्यात गुंतवणूक वाढवली आहे.

काय म्हणतो, वर्ल्ड गोल्ड कौन्सिल अहवाल

गुंतवणूक : एप्रिल-जूनमध्ये भारत 20 टक्के वाढून 30 टन झाला. गेल्या वर्षी याच काळात ते केवळ 25 टन होते.
आयात : 34 टक्के ते 170 टन. एप्रिल ते जून 2021 दरम्यान ते फक्त 131.6 टन होते.
पुर्नवापर ः 18 ते 23.3 टन पर्यंत. गेल्या वर्षी याच कालावधीत ते 19.7 टन होते.

सराफा बाजारात गती वाढण्याची अपेक्षा

दिव्य मराठी एक्सपर्ट अजय केडिया यांनी सांगीतले की, पुढील महिन्यापासून सण- उत्संवामुळे सराफा बाजार चमकण्याची शक्यता आहे. सोन्याच्या आयातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने जुलैमध्ये आयात शुल्कात वाढ केली होती. यामुळे दरवाढीला आळा बसला आहे. दागिन्यांची वाढती मागणी म्हणजे किरकोळ खरेदी बंद होत आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत मागणीत सुधारणा अपेक्षित आहे. राखी, गणेशोत्सव असे सण ऑगस्टमध्ये येतील. तथापि, महागाई, रुपया-डॉलर मूल्य आणि धोरणात्मक उपायांमुळे आयात प्रभावित होऊ शकते. देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव 51 ​​हजार / 10 ग्रॅमच्या आसपास आहे. पुढील तीन महिन्यांत तो 53,500 ते रु. 54,000 (10 ग्रॅम) राहू शकतो.

तीन आठवड्यांपासून वाढती किंमत

युएस मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढ कमी करण्याचे संकेत दिले आहेत. यानंतर भारतातील सोन्याने तीन आठवड्यांची सर्वोच्च पातळी गाठली. MCX मध्ये, फ्युचर्स किंमत 1.45 ट्क्के ने वाढून 51,530 (10 ग्रॅम) वर पोहोचली.

पहिले गोल्ड स्पॉट एक्सचेंज आजपासून
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गांधीनगरमध्ये देशातील पहिल्या गोल्ड स्पॉट एक्सचेंजचे उद्घाटन करणार आहेत. यामुळे सोन्याचा व्यवसाय वाढण्यास आणि त्यात पारदर्शकता येण्यास मदत होईल. हे गुजरातमधील GIFT (Gujarat International Finance Tech) शहरात आहे. हे शेअर बाजाराप्रमाणे काम करेल. त्यामुळे सराफा व्यापारी, रिफायनर्स आदींना सोने खरेदी करता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...