आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टाळेबंदी:होम अप्लायन्सेस मागणी; कोरोनाचा परिणाम नाही : सर्व्हे

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • टीव्ही, फ्रिज उपकरणांची खरेदी लोकांच्या लोकांच्या प्राधान्यक्रमात समाविष्ट

होम अप्लायन्सेसच्या विक्रीबाबत बोलायचे झाल्यास एप्रिलचा महिना देशव्यापी टाळेबंदीमुळे पूर्ण पाण्यात गेला आहे. मात्र, मे महिना त्यापेक्षा बरा राहिला. याचे कारण, ऑनलाइन-ऑफलाइन माध्यमातून विक्रीची सुरुवात होणे आणि होम अप्लायन्सेसची मागणी कायम राहणे हे होय. मात्र, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पैशाची बचत काळाची गरज होऊ शकते. असे असताना लोक अशा वेळी ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू खरेदी करण्यास तयार आहेत. मार्केट रिसर्च निल्सनच्या ताज्या अहवालात ही माहिती दिली आहे. 

देशातील १२ शहरांत केलेल्या या पाहणीत २८% लोकांनी सांगितले की, ते येत्या काही आठवड्यांत एक होम अप्लायन्स खरेदी करण्याचा विचार करत आहेत. सध्याच्या स्थितीत सुटीवर जाणे, दुचाकी किंवा चारचाकी वाहन खरेदी आणि घराचे नूतनीकरण करण्यासारख्या योजना टाळलेल्या असताना त्यांनी हा विचार केला. असे असताना ते घरगुती उपकरणे खरेदी करू इच्छितात. निल्सनचे दक्षिण आशियाचे अध्यक्ष प्रसून बसू म्हणाले, उन्हाळ्याच्या सुट्या असताना ग्राहक कसा विचार करतात हे पाहणीतून जाणू इच्छित होतो. मार्चमध्ये कोरोना संकट सुरू होण्याआधी ट्रॅव्हल, ग्राहकोपयोगी वस्तू खरेदी, घराचे नूतनीकरण यासारखी कामे त्यांच्या टॉप अजेंड्यावर होती.

मे महिन्याच्या तुलनेत विक्रीत वाढ होईल

कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊननंतर मागणी जास्त आहे. लोक खरेदीच्या यादीतून ग्राहकोपयोगी वस्तूंना हटवत नाहीत. मेच्या सुरुवातीस तीन आठवड्यांत कन्झ्युमर ड्युरेबल वस्तूंंची विक्री गेल्या वर्षी या अवधीत झालेल्या विक्रीच्या ३०% पर्यंत पाेहोचली आहे. जूनमध्ये हा ५०% पर्यंत पोहोचू शकतो.

ई-कॉमर्स : विविध उत्पादनांच्या विक्रीत वाढ

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्री आधीपासूनच वाढली आहे. लॅपटॉप, स्मार्टफोन, टीव्हीपासून वॉशिंग मशीनसाठी मिळणाऱ्या ऑर्डरमध्ये वेगाने वाढ झाली आहे. सुपर प्लॉस्ट्रॉनिक्सचे सीईओ अवनीतसिंह मारवाह म्हणाले, या वर्षी ई-कॉमर्सवरील त्यांची विक्री ७०% पर्यंत वाढली आहे.

नियम शिथिलतेत लोकांचा विश्वास वाढला

उत्तर भारतात सूर्य कोपत आहे. उष्ण हवेसोबत लोकांमध्ये एसी, रेफ्रिजरेटर आदी उत्पादनांची मागणी वाढत आहे. अनेक राज्यांत लॉकडाऊन नियमांत शिथिलता दिली आहे. हळूहळू इलेक्ट्रॉनिक शोरूम सुरू झाली. यामुळे ग्राहकांत विश्वास काही अंशापर्यंत वाढला आहे. - कमल नंदी, बिझनेस हेड व ईव्हीपी, गोदरेज अप्लायन्सेस

मुंबई-कोलकाता वगळता इतरत्र विक्री

देशात ४ हजार रिटेल आऊटलेट आहेत. यापैकी कमीत कमी १९०० किंवा ४८% आऊटलेट उघडली आहेत. कोलकाता, मुंबईसारखी शहरे वगळता ७०% आऊटलेट उघडली आहेत. दिल्ली देशातील सर्वात मोठ्या बाजारांपैकी एक आहे. येथे जवळपास ५०-६०% दुकाने उघडली आहेत.- -कृष्ण सचदेव, एमडी, करिअर मीडिया इंडिया

बातम्या आणखी आहेत...