आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Demand For Home Will Rise By 10% Despite High Interest Rates, Debt Burden On Real Estate Developers Eases, Credit Profile Strengthened

नवी दिल्ली:उच्च व्याजदर अन् किमती तरीही घराची मागणी 10 % वाढणार, रिअल इस्टेट विकासकांवरचा कर्जाचा भार घटला, क्रेडिट प्राेफाइल भक्कम

दिव्‍य मराठी इनसाइट2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खर्च आणि व्याज दोन्ही वाढूनही देशातील रिअल इस्टेट क्षेत्र चांगल्या स्थितीत आहे. उच्च आधारभूत प्रभाव असूनही चालू आर्थिक वर्षात देशातील घरांची मागणी ५ ते १० टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. गेल्या आर्थिक वर्षात घरांच्या मागणीत ३३-३८% वाढ झाली असली तरी कमी आधारभूत प्रभावामुळे ही वाढ झाली. एक वर्षापूर्वी २०२०-२१ या आर्थिक वर्षात, कोविड आणि लॉकडाऊनमुळे, देशातील घरांची मागणी २०-२५ टक्क्यांनी कमी झाली होती. रेटिंग आणि संशोधन संस्था क्रिसिलच्या अहवालानुसार, ३१ मार्च रोजी संपणाऱ्या २०२१-२२ या आर्थिक वर्षात रिअल इस्टेट विकासकांवरील कर्जाचा बोजा कमी झाला आहे आणि त्यांचे क्रेडिट प्रोफाइल मजबूत झाले आहे. ही ताकद मध्यम कालावधीत (३-५ वर्षे) मजबूत राहण्याची शक्यता आहे.

महागाईचा परिणाम दिसू लागला
देशातील वाढत्या महागाईचा परिणाम गृहनिर्माण क्षेत्रावरही दिसून येत आहे. २०१६ आणि २०२१ दरम्यान घराच्या परवडण्यामध्ये २०% वाढ झाली होती, परंतु आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या दुसऱ्या सहामाहीपासून ती कमी होऊ लागली. उच्च बांधकाम खर्च, व्याजदरात वाढ, काही शहरांमध्ये मुद्रांक शुल्क सवलत संपुष्टात आणणे याचाही परिणाम हाेत आहे.

२०२०-२१ नंतर परिस्थितीत सुधारणा, मागणीत वाढ

आर्थिक वर्षमागणीइन्व्हेंटरी ​​​​​​​लाँचिंग
2017-1818.0-18.568.0-68.522.0-22.5
2018-1918.0-18.572.0-72.519.0-19.5
2019-2017.5-18.073.5-74.011.0-11.5
2020-2114.0-14.567.0-6.755.0-5.5
2021-2219.0-19.558.0-60.08.5-9.0
2022-2319.5-20.548.0-50.016.0-16.5

(आकडे काेटी चाैरस फुटांमध्ये) स्रोत: क्रिसिल, २०२१-२२ व २०२२-२३चे आकडे )

घरे १०% पर्यंत महाग हाेऊ शकतात
क्रिसिलचे संशाेधन संचालक अनिकेत दाणी म्हणाले, ‘चालू आर्थिक वर्षात अव्वल सहा शहरांमध्ये घरांच्या किमती ६-१० % वाढण्याची आम्हाला अपेक्षा आहे. स्टील-सिमेंटसारख्या बांधकाम साहित्याच्या किमती वाढतील आणि मागणी-पुरवठ्यापेक्षा जास्त होईल. काही बांधकाम व्यावसायिकांनी दर तिमाहीत २ टक्क्यांनी किमती वाढवण्यास सुरुवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...