आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवसाय:विगसाठी भारतीय केसांना मागणी, गेल्या वर्षी 6350 कोटी रु.ची निर्यात

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दररोज ६० ते ८५ हजार यात्रेकरू तिरुपती तिरुमला मंदिराला भेट देतात. अनेक जण सुमारे वीस तासांच्या प्रतीक्षेनंतर विष्णूचा अवतार असलेल्या व्यंकटेश्वराचे दर्शन घेऊन तृप्त झाले आहेत. मात्र, यापैकी निम्मे लोक मुंडण करतात. तेथे दरवर्षी १३०० हून अधिक न्हावी सुमारे १२ लाख लोकांचे मुंडण करतात. लोक मनोकामनापूर्तीसाठी केस अर्पण करतात. साहजिकच तिथे खूप केस साचतात. २०१९ मध्ये मंदिराने सुमारे १३ कोटी रुपयांना १५७ टन केसांचा लिलाव केला. यातील बहुतांश केस पश्चिम बंगालमधील केस उद्योगात जातात. या केसांपासून विग तयार केले जातात.

कोलकात्यापासून ५० किमी अंतरावर असलेल्या बनिबन जगदीशपूर गावात विविध आकारांचे विग बनवण्यासाठी कामगार शॅम्पूने केस धुतात आणि वाळवतात. विग बनवणारे सिकंदर अली म्हणतात, “मला फक्त लग्नासाठी विग खरेदी करणारे ग्राहकही भेटतात, पण बरेच लोक ते आयुष्यभर घालतात.’

बहुतांश भारतीय केसांत फारसे रसायन वापरत नाहीत, त्यामुळे केसांचा दर्जा चांगला राहतो. अशा केसांना कोणताही आकार देता येतो, असे प. बंगालमधील निर्यातदार मुश्ताक सांगतात. व्यवसायाची कमी गुंतवणूक आणि चांगला नफा यामुळे फसवे लोक व्यवसायाकडे आकर्षित झाले आहेत. चिनी टेरिफ टाळण्यासाठी तस्कर केसांवर उत्पादनांना कापसाचे लेबल लावतात. गेल्या वर्षी म्यानमारच्या सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांनी चीनला जाणाऱ्या १२० बॅगा जप्त केल्या होत्या. त्यात दोन कोटी रुपयांचे मानवी केस होते. भारतीय केस बांगलादेशातही जातात. भारताने यावर्षी मानवी केसांच्या निर्यातीचे नियम कडक केले आहेत. त्यासाठी व्यापाऱ्यांना परवाना घ्यावा लागतो. केस उद्योगाशी संबंधित लोकांना आशा आहे की, नवीन नियमांमुळे कच्चा माल निर्यात करण्याऐवजी भारतात घरगुती विग बनवण्याचा व्यवसाय वाढेल. परंतु, अनेक छोट्या व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, उपलब्ध केस तयार करण्यासाठी पुरेसे कारखाने उपलब्ध नाहीत. केवळ मोठ्या कंपन्यांना निर्यातीसाठी परवाना मिळतो. छोटे निर्यातदार शेख हबीब म्हणतात, माझ्या व्यवसायावर परिणाम होत आहे. ४७ हजार कोटी रु. चा जागतिक व्यवसाय अॅरिझोना मार्केट रिसर्च कंपनीच्या मते, २०२१ मध्ये विग आणि केसांचा जागतिक व्यवसाय ४७,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. मानवी केसांद्वारे जगातील ३५% विग आणि केस तयार होतात. गेल्या वर्षी भारताने ६३५० कोटी रुपयांच्या मानवी केसांची निर्यात केली होती. २०२० च्या तुलनेत हे दुप्पट आहे.

बातम्या आणखी आहेत...