आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Demand For Passenger Vehicles Will Moderate Growth, Moderate Growth In Next Few Quarters And Economy Will Be Completely Unlocked: Report

अहवाल:प्रवासी वाहनांच्या मागणीत मध्यम वाढ होईल, पुढील काही तिमाहींत मध्यम वाढ होईल आणि अर्थव्यवस्था पूर्णत: अनलॉक होईल : अहवाल

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवासी वाहनांच्या मागणीत पुढील काही तिमाहींत मध्यम वाढ होईल आणि अर्थव्यवस्था पूर्णत: अनलॉक होईल. विशेषकरून ग्रामीण भागातील मागणीत सुधारणा हाेऊन ती पुनरुज्जीवित होईल, असा अंदाज अॅक्विट रेटिंग्ज अँड रिसर्च या संस्थेने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे.

परंतु सेमीकंडक्टर पुरवठ्यातील अडचणी आणि किरकोळ इंधनाच्या किमतीतील तीव्र वाढ यामुळे परिमाणदृष्ट्या मागणी मर्यादित राहील. सेमीकंडक्टर पुरवठ्यातील आव्हाने असूनही काही मॉडेल्ससाठी प्रतीक्षा कालावधी दीर्घ वाढून तसेच उत्पादन कपात हाेऊनदेखील प्रवासी वाहनांच्या विक्रीने २०२२ आर्थिक वर्षात वार्षिक आधारावर १४.७ टक्क्यांची वाढ नाेंदवली असल्याचे अॅक्विटने एका निवेदनात म्हटले आहे.

अर्थव्यवस्था अनलॉक झाल्यामुळे आणि निरोगी कृषी उत्पादनाच्या अपेक्षेमुळे आर्थिक वर्ष २०२३ मध्ये पुन्हा मागणी येईल, अशी अपेक्षा आहे. पण त्यासाठीची कालमर्यादा अनिश्चित आहे. किरकोळ इंधनाच्या किमती झपाट्याने वाढल्याने त्याचा परिणाम होऊ शकतो, असे अहवालात म्हटले आहे.

अर्थव्यवस्था अनलॉक केल्याने आणि देशातील पायाभूत सुविधांच्या विकासावर आणि राष्ट्रीय महामार्गांच्या विस्ताराकडे सरकारने लक्ष केंद्रित केल्यामुळे व्यावसायिक वाहनांच्या मागणीतील सुधारणा कायम राहील, असे अॅक्युट रेटिंग्ज अँड रिसर्च लिमिटेडचे मुख्य विश्लेषण अधिकारी सुमन चाैधरी यांनी सांगितले. सध्याच्या भौगोलिक-राजकीय परिस्थितीमुळे किरकोळ इंधनाच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे वाहतूकदारांच्या मार्जिनवर दबाव येईल आणि नजीकच्या काळात नवीन वाहनांच्या खरेदीवर परिणाम होईल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...